Broccoli Almond Soup: हिवाळ्यात ट्राय करा आरोग्यदायी ब्रोकोली बदाम सूप

Winter Soup: हिवाळ्यात डिनरमध्ये सुप प्यायचा विचार करत असाल तर ट्राय करा ब्रोकोली बदाम सुप
Broccoli Almond Soup
Broccoli Almond SoupDainik Gomantak
Published on
Updated on

हिवाळ्यात आरोग्याची काळजी घेणे खुप फायदेशीर असते. यासाठी आहारात पोषक घटकांचा समावेश करणे आवश्यक आहे. आहारात प्रोटीनचा समावेश करण्यासाठी अनेक पर्याय आहेत. तुम्ही क्रीमी ब्रोकोली आणि बदाम सूपचे सेवन करु शकता. लहानांपासून मोठ्यांपर्यंत कोणीही ते आरामात घेऊ शकतात. हिवाळ्यात हा सुप घेतल्यास तुम्ही निरोगी राहाल.

ब्रोकोली बदाम सूप बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • व्हेजिटेबल स्टॉक - 800 मिली

  • ब्रोकोली - 700 ग्रॅम

  • बदाम (तळलेले) - 50 ग्रॅम

  • स्किम्ड मिल्क - 250 मिली

  • मीठ - चवीपुरते

  • मिरपूड - चवीपुरते

Broccoli Almond Soup
Juice for Diabetes Patients: मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी हे ज्यूस आहेत गुणकारी...
  • ब्रोकोली बदाम सूप बनवण्याची पध्दत

ब्रोकोली (Broccoli) आणि बदाम सूप बनवण्याची पध्दत खुप सोपी आहे. सर्वात आधी ब्रोकोलीचे लहान तुकडे करुन घ्यावे. नंतर 6 ते 8 मिनिटे वाफवून घ्यावे. व्हेजिटेबल स्टॉकमध्ये ब्रोकोली घाला. या मिश्रणात बदाम आणि स्किम्ड दूध मिक्सरमध्ये चांगले बारिक घ्या. या क्रीम सूपमध्ये मीठ आणि मिरपूड घाला आणि चांगले मिक्स करा. मंद आचेवर 5 मिनिटे उकळा. तुमचे ब्रोकोली बदाम सूप तयार आहे. गरमा गरम सूपचा आस्वाद घ्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com