Parijat Flowers: हिवाळ्यात पारिजात फुलांचा असा करा वापर, अनेक समस्या होतील दूर

जर तुमच्या घरी पारिजातचे रोप असेल तर त्याच्या फुलांचा आणि पानांचा वापर करू शकता.
Parijat Flowers
Parijat FlowersDainik Gomantak
Published on
Updated on

Parijat Flowers: पारिजात फुल सुंदर आणि सुवासिक असतात. यालाच रात राणी असेही म्हणतात. त्याचा सुंगध सर्वांना आवडतो. या फुलांचा वापर अनेक आजारांसाठी केला जातो. तुम्हाला माहीत नसेल, पण या फुलांचा वापर अनेक घरगुती कामांसाठीही केला जाऊ शकतो.

  • थंडीपासून बचाव

हिवाळ्यात सर्दी-खोकल्याची समस्या वाढते. अशा वेळी प्रत्येक वेळी औषध घेणे योग्य नाही, पण काय करावे, औषध घेतल्याशिवाय आजार कमी होत नाही. अशावेळी पारिजात फुलांचा वापर करू शकता. हे मलेरिया, डेंग्यू आणि चिकुनगुनिया तापासह विविध प्रकारचे ताप बरं करण्यास मदत करू शकते. ताज्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की पारिजातच्या पानांचा आणि सालाचा अर्क ताप त्वरित कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. 

  • लागणारे साहित्य

पारिजात पाने - 2 ग्रॅम

साल - 3 ग्रॅम

तुळशीची पाने- 2-3

  • असे औषध तयार करा

तुळशीच्या पानांसह साल आणि पाने घेऊन पाण्यात उकळा.

नंतर थंड करून दिवसातून दोनदा प्यावे.

  • खत तयार करणे

तुम्हाला माहीत नसेल पण पारिजात फुलांमध्ये भरपूर सुगंध असतो. ज्याचा उपयोग एअर फ्रेशनर किंवा खत बनवण्यासाठी केला जातो. यासाठी तुम्हाला जास्त काही करण्याची गरज नाही, फक्त खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. 

  • लागणारे साहित्य

पारिजात फुले- 5

पाणी - 2 वाट्या

मीठ - आवश्यकतेनुसार

  • बनवण्याची पद्धत

वर नमूद केलेले सर्व साहित्य तयार करा. 

नंतर पारिजातची फुले एका कढईत ठेवून मीठ व पाणी घालून चांगले शिजवून घ्यावे.

उकळी आल्यावर गॅस बंद करून थंड करावे.

आता तुम्ही ते तुमच्या प्लांटमध्ये ठेवू शकता. तसेच, मातीमध्ये वापरण्याव्यतिरिक्त, आपण हे मिश्रण पानांवर देखील फवारू शकता. 

  • पारिजात पानांचा वापर

पारिजातच्या पानांचा वापर भातातील कीटकांपासून बचाव करण्यासाठी केला जाऊ शकतो. यासाठी तांदळात कडुलिंबाची पाने टाकून ठेवावे. 

टाइल्स साफ करण्यासाठी तुम्ही पारिजातच्या पानांचा स्प्रे म्हणूनही वापर करू शकता. 

  • या हेतूंसाठी देखील वापरा

मुंग्यांना घालवण्यासाठी तुम्ही घरी तयार केलेला पारिजात स्प्रे देखील वापरू शकता. स्वयंपाकघरातील कपाटातील कीटक दूर करण्यासाठी तुम्ही त्याचा स्प्रे देखील वापरू शकता.

पारिजातच्या पानांचा वापर भात, कडधान्य इत्यादी पिकांतील कीटकांना दूर करण्यासाठी केला जाऊ शकतो. 

अशा प्रकारे आपण पारिजात फुले आणि पाने वापरू शकता. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Terrorist Secret Communication
Goa Transport Department Action
Traditional Indian Swing
Goa town planning rule changes
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com