Winter Care: हिवाळ्यात अति पाणी पिताय? मग वेळीच व्हा सावध अन्यथा....

पाणी पिणे आरोग्यदायी असते पण हिवाळ्यात अति पाणी पिणे घातक ठरू शकते.
Winter Care:
Winter Care:Dainik Gomantak
Published on
Updated on

Cold Water: थंडीच्या दिवसांमध्ये ज्या लोकांना हृदय आणि पोटाशी संबंधित गंभीर आजार आहे त्यांनी जास्त पाणी पिणे टाळावे. बाकी दिवसांच्या तुलनेत थंडीत हृदयविकाराचा धोका वाढतो. 

हिवाळ्यात जास्त पाणी पिणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. हिवाळ्यात हृदयविकार असलेल्यांनी कधी आणि किती पाणी प्यावे हे जाणून घेतले पाहिजे. कोरोना महामारीनंतर जगभरात हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकने मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढली आहे. 

हिवाळ्यात हृदयविकार असलेल्या लोकांच्या समस्या वाढतात. उन्हाळा किंवा इतर ऋतूंच्या तुलनेत हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका अनेक पटींनी वाढतो. याचे मुख्य कारण म्हणजे थंडीत रक्त पंप करण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत करावी लागते.

हिवाळ्यात शरीरातील शिरा आकसायला लागतात. अशावेळी शरीराला उबदार करण्यासाठी हृदयाला जलद पंप करावा लागतो. त्यामुळे हृदयरोग्यांच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढतात. थंडीच्या दिवसात जास्त पाणी पिणे तुम्हाला अडचणीत आणू शकते.

  • अति पाणी पिणे घातक

कोरोना महामारीमुळे जगभरातील लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण वाढत आहे. थंडीच्या दिवसांमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. थंड हवामानात त्याची प्रकरणे अनेक पटींनी वाढतात. त्यामुळे अति पाणी पिण्यापूर्वी काळजी घ्यावी. 

  • हिवाळ्यात जास्त पाणी पिणे हृदयासाठी धोकादायक

हिवाळ्यात काही लोक सकाळी रिकाम्या पोटी उठल्याबरोबर 3-4 ग्लास पाणी पितात. हृदयविकार असलेल्या लोकांनी असे काही केले तर त्यांचे खूप नुकसान होऊ शकते. यामुळे रक्तातील साखरेची पातळीही कमी होऊ शकते. शरीराची स्वायत्त मज्जासंस्था ती सामान्य करण्याचे काम करते. जेव्हा एखादी व्यक्ती जास्त प्रमाणात द्रव आहार घेते तेव्हा हृदयाला पंप करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. 

Winter Care:
Mobile Password: तुम्ही तुमच्या फोनचा पासवर्ड विसरलाय? मग वापरा 'या' सिंपल ट्रिक्स
  • रिकाम्या पोटी थंड पाणी पिणे टाळावे

हृदयविकार असणाऱ्या लोकांनी रिकाम्या पोटी पाणी पिणे टाळावे. कारण यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. कारण पाण्यामुळे शिरा कडक होतात. त्यामुळे शरीराला रक्तपुरवठा करण्यासाठी हृदयाला जास्त मेहनत करावी लागते. यामुळे हृदयविकाराचा धोका जास्त वाढू शकतो. रिकाम्या पोटी पाणी प्यायचे असेल तर कोमट पाणी प्यावे. चुकूनही पाणी पिऊ नका. यामुळे हृदयासंबंधित समस्या निर्माण होऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com