Car Care Tips: थंडीमध्ये कारच्या काचांवर जमलेल्या धुक्यामुळे होऊ शकतो अपघात; 'हे' उपाय करतील बचाव

कारच्या काचांवर धुकं सहसा हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात दिसून येते. जेव्हा आपण कारमध्ये आरसे बंद ठेवून प्रवास करत असतो तेव्हा त्यात कार्बन डाय ऑक्साईड साचतो आणि वरती गाडीच्या काचाही थंड होतात, त्यामुळे काही वेळाने धुक्याच्या रूपात येथे साचू लागते.
Winter Car Care Tips
Winter Car Care Tips Dainik Gomantak
Published on
Updated on

Car Care Tips: थंडीच्या दिवसांमध्ये स्वतःची काळजी घेणे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि बहुतेक लोक ते खूप चांगल्या पद्धतीने स्वत:ची काळजी घेतात. पण जेव्हा त्यांच्या वाहनांची काळजी घेण्याचा प्रश्न येतो तेव्हा काही लोकांना ते करणे अशक्य होते.

थंडीच्या दिवसांमध्ये वाहनाची काळजी घेणे गरजेचे असते. जर कारच्या काचांवर धुकं जमा झाले असेल तर ते टाळण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊया.

धुकं का जमा होते?

कारच्या काचांवर धुकं सहसा हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात दिसून येते. जेव्हा कारचे काच बंद ठेवून प्रवास करत असतो तेव्हा त्यात कार्बन डाय ऑक्साईड जमा होते आणि गाडीच्या काचाही थंड होतात, त्यामुळे काही वेळाने धुकजमा होऊ लागते. तापमानातील फरकामुळेही हे दिसून येते. हे एखाद्याच्या बाबतीत घडल्यास दृश्यमानता कमी होते आणि अपघाताची शक्यता वाढते.

हे टाळण्यासाठी पुढील गोष्टी करू शकता

ब्लोअरचे सेटिंग

हिवाळ्यात कारच्या काचावर धुक जामा झाल्यास तुम्ही ब्लोअरवर विंडशील्ड सेट करू शकता, ज्यामुळे ते बर्‍याच प्रमाणात दूर होते.

डिफॉगरचा वापरा

कारच्या काचांवर असलेल्या धुक्याचा थर कमी करण्यासाठी डिफॉगर वापरणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. डिफॉगर समोर आणि मागील दोन्हीसाठी येतो.

एसी चालू करणे

हिवाळ्यात कोणीही एसी चालू करत नाही. पण एसी काही मिनिटांसाठी चालू करावा. त्यामुळे कारच्या काचेवर असलेले धुके कमी होते आणि त्यामुळे दृश्यमानताही सुधारते.

काच किंचित उघडा

हिवाळ्यात कारच्या काचांवरील धुकं दूर करण्यासाठी तुम्ही काच थोडीशी उघडू शकता. असे केल्याने कारच्या आत ऑक्सिजन जातो आणि काही मिनिटांत समस्या दूर होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com