National Friendship Dayला गिफ्ट देवून फ्रेंडशिप बँड का बांधायचा, जाणून घ्या इतिहास

मैत्री हे एकमेव नाते आहे जे आपण रक्ताने नव्हे तर प्रेमाने निवडत असतो.
National Friendship Day 2022
National Friendship Day 2022Dainik Gomantak
Published on
Updated on

मैत्री हे एकमेव नाते आहे जे आपण रक्ताने नव्हे तर प्रेमाने निवडत असतो. दोन किंवा अधिक साथीदारांमधील बंधनासारखे शुद्ध काहीही नसते. मित्र ही अशी व्यक्ती असते जी आपल्याला साथ देते आणि कठीण प्रसंगी खडकासारखी आपल्या सोबत उभी असते. (Why to tie a friendship band by gifting on National Friendship Day know the history)

National Friendship Day 2022
Anxiety Attack: एन्जायटी अटॅक आल्यावर काय कराल ? हे उपाय केल्यावर मिळेल क्षणात आराम

दरवर्षी, भारतात ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जातो. ही वेळ आहे ज्यांनी आपल्या पाठीशी उभे राहून आपल्याला खंबीर साथ दिली आणि मार्गदर्शन केले त्यांचे कौतुक करण्याची. फ्रेंडशिप डे वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो.

Friends
FriendsDainik Gomantak

आंतरराष्ट्रीय मैत्री दिन दरवर्षी 30 जुलै रोजी साजरा केला जातो, तर भारतात तो ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा करण्यात येतो. यावर्षी तो 7 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो.

याचा इतिहास आणि या दिवसाची कल्पना, 1930 च्या दशकामध्ये हॉलमार्क कार्ड्सचे संस्थापक जॉयस हॉलद्वारे मार्केटिंग गेम म्हणून प्रथम उदयास आली होती. त्यावेळी, कंपनीच्या संस्थापकाने हा दिवस तुमच्या जवळच्या लोकांच्या स्मरणार्थ आणि प्रशंसा करण्यासाठी ठेवला होता.

अखेरीस, 1935 मध्ये अमेरिकन काँग्रेसमध्ये ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे साजरा केला जाईल अशी घोषणा करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्रांनी मात्र वेगळी तारीख सांगितली.

National Friendship Day 2022
Ajwain Benefits : ओव्याचे चमत्कारिक गुणधर्म शरीरासाठी आहेत फायदेशीर

आंतरराष्ट्रीय मैत्री दिवसाची घोषणा अधिकृतपणे 2011 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने केली असली तरीही. संयोगाने असे मानले जाते की पहिला फ्रेंडशिप डे सन 1958 मध्ये पॅराग्वे यांनी ही तारीख आणि कल्पना मांडली होती तसेच ते या कल्पनेचे ते पहिले व्यक्ती होते.

मित्रांनो कदाचित आपल्यापैकी बहुतेकांना स्वेच्छेने निवडण्यासाठी मिळालेले एकमेव नाते म्हणजे मैत्री आणि ती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. अ‍ॅरिस्टॉटलने असे म्हटले की 'माणूस हा एक सामाजिक प्राणी आहे'. मित्र हे असे घट्ट नाते आहे जे एकमेकांच्या वय, वंश किंवा धर्माची पर्वा न करता पूर्णपणे प्रेम आणि आदराचे नाते आहे.

मित्र सल्ला आणि समर्थन देऊ शकतात आणि गरजेच्या वेळी सांत्वन देखील करतात. साहजिकच, हा दुतर्फा रस्ता आहे आणि त्या अपेक्षा तुम्हालाही पूर्ण कराव्या लागतात. भारतात, लोक भेटवस्तूंची देवाणघेवाण करतात किंवा काही वेळा, मित्रांच्या हातामध्ये फ्रेंडशिप बॅंन्ड देखील बांधतात. एखाद्या व्यक्तीने मित्राच्या हातामध्ये त्यांच्या मैत्रीचे प्रतीक म्हणून ब्रेसलेट देखीले बांधावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com