Summer Skin Care: उन्हाळ्यात स्किन केअर रूटीनमध्ये सनस्क्रीन लावणे का गरजेचे? वाचा एका क्लिकवर

उन्हाळामध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी पहिले सनस्क्रीनची आठवण येते. पण फक्त उन्हाळ्यातच नाही तर हे प्रत्येक ऋतुत वापरले पाहिजे.
Sunscreen Lotion Benefits
Sunscreen Lotion BenefitsDainik Gomantak

Summer Skin Care Tips: सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच नाही तर प्रत्येक ऋतुमध्ये वापरले पाहिजे. यामागचे नेमके कारण काय आणि सनस्क्रीनचा कसा फायदा होतो हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

आपल्या त्वचेचे आरोग्य आणि सौंदर्य टिकविण्याचा सर्वात चांगला आणि सोपा मार्ग म्हणजे दररोज आपल्या चेहऱ्याला सनस्क्रीन लावणे आहे.

उन्हाळ्यात सनबर्न आणि अतिनील किरणांपासून नुकसान टाळण्यासाठी सनस्क्रीन लावणे गरजेचे आहे. परंतु बर्‍याचदा बाहेर जाताना किंवा घरामध्ये (Home) असताना सनस्क्रीन वापरण्याकडे दुर्लक्ष केले जाते.

ज्यामुळे त्वचेचे (Skin) कधीही भरून न येणारे नुकसान होते. कोणत्या प्रकारचे सनस्क्रीन खरेदी करायचे आणि कसे लावायचे हे जाणून घेणे ही त्वचेच्या अनेक समस्या टाळण्याची गुरुकिल्ली आहे.

  • त्वचेचा कर्करोग

सूर्यप्रकाशातील अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे त्वचेच्या पेशी खराब होऊ शकतात आणि त्वचेचा कर्करोग होऊ शकतो. सनस्क्रीन वापरल्याने अल्ट्राव्हायोलेट किरणांचा संपर्क कमी होतो आणि त्वचेचा कर्करोग होण्याचा धोका निम्म्यापर्यंत कमी होतो.

  • फोटोएजिंग

अतिनील किरणांमुळे त्वचेचा पोत, रंग बदलतो. अतिनील किरणांमुळे कोलेजेन आणि इलास्टिन कमी होते. यामुळे त्वचेवर सुरकुत्या पडणे, काळवंडणे आणि त्वचा रुक्ष व निस्तेज वाटु लागते. जे लोक दररोज सनस्क्रीन योग्य प्रकारे वापरतात. त्यांच्यात वृद्धत्वाची लक्षणे दिसण्याची शक्यता 24% कमी असते.

  • सनस्क्रीन कधी वापरावे

- तुम्ही ढगाळ वातावरणातही सनस्क्रीन वापरु शकता.

- बर्फ हानीकारक अतिनील किरणांपैकी 80% परावर्तित करतो आणि त्यामुळे सूर्याचे नुकसान होण्याची शक्यता वाढते. जितकी उंची जास्त तितके एक्सपोजर जास्त असते.

- तुम्हाला विमानातही सनस्क्रीन लावणे गरजेचे असते. कारण तुम्ही विमानात असलात तरीही सूर्यकिरण कोणत्याही फिल्टरशिवाय तुमच्यापर्यंत पोहोचत असतात.

- तुमची त्वचा काळी, सावळी असली तरीही तुम्हाला दररोज सनस्क्रीन लावणे फायदेशीर आहे.

- सनस्क्रीन 2-3 तासांनी पुन्हा लावणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com