नवीन पिढीमध्ये का लोकप्रिय होतोय Situationship?

सिच्युअशनशिपची क्रेझ दिवसेंदिवसे तरूणांमध्ये का वाढत आहे हे जाणून घेऊया.
Situationship
SituationshipDainik Gomantak
Published on
Updated on

आजकालच्या नव्या पिढीसाठी प्रेम आणि नातेसंबंधांचा अर्थही बदलत आहे. एक काळ असा होता की मुलगी आणि मुलगा यांचे लग्न घरातील मोठे लोकच ठरवायचे. पण आजच्या पिढीमध्ये प्रेमाचा अर्थ पूर्णपणे बदलला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्याशी जवळीक साधतो येते तेव्हा त्याला रिलेशनशिप असे म्हणतात. या स्थितीत दोघेही एकमेकांसोबत वेळ घालवतात आणि भविष्यात एकत्र जगण्याचा विचार करतात.

पहिले गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड अशी सज्ञा होती. यानंतर 'फ्रेंड्स विथ बेनिफिट्स' अशी संज्ञा आली. ज्यामध्ये दोन मित्र काही फायद्यासाठी एकत्र राहतात. हा फायदा कोणत्याही प्रकारचा असू शकतो. हे शारीरिक किंवा मानसिक गरज पूर्ण करण्यासाठी देखील असू शकते. किंवा त्यात एकत्र प्रवास करणे, डिनरला जाणे इत्यादींचा समावेश होतो.

दरम्यान, 'सिच्युएशनशिप' हा शब्द सध्या चर्चेत आहे. याचा अर्थ असा आहे की दोन लोक काही काळ एकत्र राहतात. सिच्युएशनशिपचा सर्वात मोठा फरक म्हणजे त्यात कोणतीही बंधणे नसतात. म्हणजेच परिस्थिती आणि संबंध पूर्णपणे भिन्न आहेत. 'सिच्युएशनशिपमध्ये जोडपे एकमेकांना वचनबद्धता देत नाहीत.

आजकाल तरुण पिढीमध्ये 'सिच्युएशनशिप' हा शब्द खूप लोकप्रिय आहे. यामध्ये दोन व्यक्ती कोणतीही जबाबदारी न घेता एकमेकांशी जोडली जातात. या नात्यात ना कुठली आश्वासने आहेत, ना कोणाच्या भविष्याची चर्चा आहे. या नात्यात दोन्ही व्यक्तींना कोणत्याही अटीशिवाय एकत्र राहण्याचा आनंद मिळतो. 'सिच्युएशनशिप' सर्वात चांगला पैलू म्हणजे त्यात व्यक्ती जबाबदाऱ्यांपासून मुक्त राहते. हे नातं कोणत्याही कारणाने संपुष्टात येऊ शकते. हे समजले जाऊ शकते की दोन लोक एकमेकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी एकत्र राहतात.

जेव्हा दोन लोकांमध्ये खुप प्रेम असते तेव्हा ते रिलेशनशिपमध्ये येतात. म्हणजेच यामध्ये दोन व्यक्तींच्या नात्याला प्रेम म्हणतात. या नात्यात गुंतलेल्या जोडप्यांना त्यांच्या मित्रपरिवाराशी एकमेकांची ओळख करून द्यायला आवडते. ते एकमेकांची ओळख गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड म्हणून करून देतात. या दोन लोकांमध्ये प्रेम आहे आणि त्यांना भविष्याबद्दल बोलणे आवडते. त्यांना आपलं आयुष्य एकमेकांसोबत घालवायचं आहे. जेव्हा दोन व्यक्ती रिलेशनशिपमध्ये असतात, तेव्हा त्यांचं नातं लग्नापर्यंत पोहोचू शकते. यामध्ये दोघांना एकमेकांच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. एकमेकांच्या जबाबदाऱ्यांना सामोरे जावे लागेल. एकमेकांच्या गरजा जपल्या पाहिजेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com