Kitchen Hack: कांदा कापताना डोळ्यातून पाणी येतं? मग वापरा या सोप्या किचन टिप्स

कांदा कापताना डोळ्यांतून अश्रू येण्याचे कारण म्हणजे एन्झाइम्स
Kitchen Hacks | Tears While Cutting Onion
Kitchen Hacks | Tears While Cutting OnionDainik Gomantak
Published on
Updated on

Kitchen Hack: बहुतेक सर्वांना स्वयंपाक करायला आवडते. पण स्वयंपाकाची एक प्रक्रिया सर्व अश्रू बाहेर आणते. स्वयंपाक करताना कांदा चिरणे हे खूप अवघड काम आहे. कांदा कापताना भल्याभल्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात. कांदा कापताना तुम्हालाही खूप अश्रू येत असतील तर आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने अश्रू थांबू शकतात. चला तर मग याविषयी जाणून घेऊया...

Kitchen Hacks | Tears While Cutting Onion
Porvorim Fire News: पर्वरी पोलीस स्थानकाशेजारी आग; 6 दुचाकी जळून खाक

कांदा कापताना अश्रू का येतात?

कांदा कापताना डोळ्यांतून अश्रू येण्याचे कारण म्हणजे एन्झाइम्स. कांदा कापल्यावर त्यातील एक वायू बाहेर येतो. ज्यापासून त्याला sy propanethial s oxide म्हणतात. त्यामुळे नाकातून डोळ्यांच्या पडद्याला त्रास होतो आणि डोळ्यातून अश्रू येतात. त्यामुळे यापासून बचाव करायचा असेल तर काही उपाय करा.

वापरा या टिप्स

1. कांदा चिरताना तुम्ही गॉगल वापरू शकता. हा एक खास प्रकारचा गॉगल आहे जो डोळ्यांपर्यंत हवा येऊ देत नाही. अशा प्रकारे, वायू तुमच्या डोळ्यांपर्यंत पोहोचणार नाही.

2. कांदा सोलल्यानंतर त्याचे मधून दोन तुकडे करा. त्यानंतर पाण्यात टाकून थोडावेळ ठेवा. कमीतकमी 15 ते 20 मिनिटे पाण्यात सोडा. या पाण्यात तुम्ही व्हाईट व्हिनेगरही टाकू शकता. असे केल्याने कांद्याचे एन्झाइम्स बाहेर पडतात आणि डोळ्यातून अश्रू येणार नाहीत.

3. कांदा कापताना अश्रू येऊ नयेत म्हणून तो कापण्यापूर्वी 20 ते 25 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा. असे केल्याने कांद्यामध्ये असलेल्या एन्झाइमचा प्रभाव संपतो आणि तो कापल्यानंतर डोळ्यातून पाणी येत नाही.

4. नेहमी धारदार चाकूने कांदे कापून घ्या. धारदार चाकूने कांदा कापला की कांद्याचा थर कापला जातो. यातून कमी एन्झाइम बाहेर पडतात. जेव्हा कांद्याच्या पेशींचा थर खराब होतो तेव्हा त्यातून कमी वायू बाहेर पडतो आणि डोळ्यांचा त्रासही कमी होतो.

5. काही लोकांचा असाही विश्वास आहे की कांदा कापताना जवळ एक मेणबत्ती लावली तर त्यातून निघणारा वायू मेणबत्तीत जातो आणि तुमच्या डोळ्यांना त्रास होत नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com