डास का चावतात? जाणून घ्या वैज्ञानिक कारण आणि उपाय

कधी विचार केलाय का याचे कारण काय असेल? डास का चावतात याचे वैज्ञानिक कारण जाणून घेऊ.
Why do mosquitoes
Why do mosquitoesDainik Gomantak
Published on
Updated on

एक डास (mosquito) काय करु शकतो हे डेंग्यु सारख्या आजारांतून आपल्याला दिसते. डास फक्त ठराविक लोकांनाच चावतात. जसे आपल्यातील अनेकांनी पाहिले असेल की, दोन मित्र एकत्र पार्क मध्ये फिरायला जातात मात्र डास एकाच्या शरीराला स्पर्शही करत नाहीत आणि दुसऱ्याच्या शरीरावर मात्र अनेक ठीकाणी चावा घेतलेला असतो. कधी विचार केलाय का याचे कारण काय असेल? डास का चावतात याचे वैज्ञानिक कारण जाणून घेऊ.

मेटाबॉलिक रेट- मानवी शरिराची पचन क्रिया ही एक गुंतागूंतीची प्रक्रीया आहे. याच प्रक्रीयेतून आपल्या शरिरातून बाहेर पडणारा कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण ठरते. आणि या कार्बन डाय ऑक्साईडच्या वासानेच डास मानसाच्या शरिराकडे आकर्षित होतात. मादी डास कार्बन डाय ऑक्साईडचा वास त्याच्या 'संवेदना अवयवां'द्वारे शोधतो. एका अभ्यासानुसार, गर्भवती महिला सामान्य मानवांपेक्षा 20 टक्के जास्त कार्बन डाय ऑक्साईड सोडतात. यामुळेच त्यांना जास्त चावतात.

स्किन बॅक्टेरिया- तुम्हाला माहित आहे का की, तुमच्या त्वचेमध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया दडलेले असतात. खरं तर ही इतकी वाईट गोष्ट नाही पण ती डासांना तुमच्या जवळ येण्यासाठी आमंत्रित करू शकते. नुकत्याच करण्यात आलेल्या एका अभ्यासात असा दावा करण्यात आला आहे की, डास फक्त काही मोजक्या जीवाणूंमुळेच जास्त आकर्षित होतात. ज्या लोकांच्या त्वचेमध्ये अनेक प्रकारचे जीवाणू आढळतात त्यांच्यावर डासांचा हल्ला होण्याची शक्यता कमी असते.

रक्ताचा प्रकार- जास्त डास चावत असले की, तुझं रक्त गोड आहे अस अनेक वेळा बोलताना ऐकले असेल. त्यांचं ते म्हणनं अतिशय योग्य आहे. कारण वैज्ञानिक पुरावे असं सांगतात की, डास सामान्य लोकांपेक्षा 'ओ' रक्तगटाच्या लोकांकडे अधिक आकर्षित होतात. दुसऱ्या क्रमांकावर 'अ' रक्तगटाचे लोक येतात. हे दोन्ही रक्तगट डासांना चुंबकासारखे आकर्षित करतात.

Why do mosquitoes
Hair Fall: महिला की पुरुष? कोणाचे केस जास्त गळतात; जाणून घ्या काय आहेत कारणं

फिकट रंगाचे कपडे - डास बहुतेकदा जमिनीभोवती प्रजनन करतात. ते तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी गंध आणि दृष्टीचा वापर करतात. त्यामुळे शक्य असल्यास हलक्या रंगाचे कपडे घालून बाहेर जा जेणे करुन डास तुमच्याकडे आकर्षित होणार नाही.

आंघोळ करा - डासांना तुमच्या शरीराचा घाम आणि लॅक्टीक Acid चा वास आवडतो. म्हणून, जेव्हाही तुम्ही व्यायामासाठी बाहेर जाता, घरी आल्यानंतर शक्य तितक्या लवकर आंघोळ करा. तसेच, वर्कआउट सुरू करण्यापूर्वी आपल्या आजूबाजूला कीटक नाशके वापरा.

बिअर पिणे टाळा- एका अभ्यासानुसार, बिअर पिणाऱ्या लोकांचे रक्त सुद्धा डासांना आवडते. त्यामुळे एकतर ते पिणे टाळा किंवा पार्टीमध्ये वेगाने फिरणारे पंखे सुरु ठेवा. डास जोरदार वाऱ्यात उडू शकत नाहीत. त्यामुळे वारा पक्ष आणि डासांमध्ये अडथळा म्हणून काम करू शकतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com