Tickling Facts: तुमच्या स्वत:ला गुदगुल्या का होत नाहीत? वाचा यामागील मजेशीर कारण

गुदगुल्या ही प्रत्येकाला जाणवणारी गोष्ट आहे.
Tickling Facts
Tickling FactsDainik Gomantak
Published on
Updated on

Tickling Facts: गुदगुल्या ही प्रत्येकाला जाणवणारी गोष्ट आहे. दुसऱ्या व्यक्तीने तुम्हाला स्पर्श करताच तुम्हाला एक संवेदना जाणवते. त्यामुळे आपण जोरदार हसायला लागतो. अनेकवेळा लहान मुलांना गंमतीने हसवण्यासाठीही असे केले जाते.

पण तुम्ही कधी हे लक्षात घेतले आहे का की तुम्हाला तुमच्याच हाताने गुदगुल्या का होत नाहीत. जेव्हा तुम्ही तुमच्या हातांनी तुमच्या शरीराला स्पर्श करण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही अजिबात हसत नाही. असे का घडते यामागे काय कारण आहे? पुढच्या लेखात सगळ कळेल.

Tickling Facts
Cholesterol Controlling: उच्च कोलेस्ट्रॉलच्या समस्येपासून लवकर सुटका हवी? मग आजच हे अन्नपदार्थ खायला सुरुवात करा

गुदगुल्यांमागील शास्त्र काय आहे

आपल्या मेंदूचे दोन भाग गुदगुल्या होण्याच्या भावनांसाठी जबाबदार असतात. पहिले म्हणजे सोमाटोसेन्सरी कॉर्टेक्स. हा असा भाग आहे ज्याला स्पर्श होतो. दुसरे म्हणजे अँटीरियर सिंग्युलेट कॉर्टेक्स. हे आनंद आणि संवेदना समजून घेण्याचे कार्य करते.

जेव्हा आपण स्वतःला गुदगुल्या करतो, तेव्हा मेंदूच्या सेरेबेलम भागाला याची आधीच कल्पना येते, जी कॉर्टेक्सला याबद्दल माहिती देते. या प्रकरणात, गुदगुल्यासाठी तयार कॉर्टेक्स आधीच जागृत होते. ज्यामुळे आपल्याला गुदगुल्या होत नाहीत.

गुदगुल्या जाणवण्यासाठी सरप्राईज एलिमेंटची खूप गरज असते. जेव्हा आपण स्वतःला गुदगुल्या करतो, तेव्हा मेंदू आधीच त्वचेला एक सिग्नल पाठवतो, की गुदगुल्या होणार आहेत, अशा परिस्थितीत, आश्चर्याचा घटक संपतो आणि व्यक्तीला गुदगुल्या झाल्यासारखे वाटत नाही.

पण जेव्हा दुसरी व्यक्ती आपल्याला गुदगुल्या करते तेव्हा मेंदू हा सिग्नल आधीच पाठवू शकत नाही. यासाठी मेंदू अगोदर तयार नसतो आणि जेव्हा त्याला अचानक गुदगुल्या होतात तेव्हा आपण खूप हसतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com