Festival Tips: सणासुदीला हाय हील्स घालतांना 'या' गोष्टी ठेवा लक्षात, पाय राहतील निरोगी

Tips For High Heels And Foot Health: तुम्हीही या सणासुदीच्या काळात स्मार्ट लूक मिळवण्यासाठी हाय हिल्स खरेदी करणार असाल तर ही बातमी नक्की वाचा.
high heels
high heelsDainik Gomantak
Published on
Updated on

सणासुदीचा हंगाम सुरू होताच घरातील महिलाही खरेदीला (Shopping) सुरुवात करतात. करवाचौथ ते दिवाळी या मुहूर्तावर काय घलावे करावे, या सर्व गोष्टींची चर्चा आतापासूनच सुरू झाली असावी. पण कोणत्याही ड्रेसमध्ये लुक चांगला दिसण्यासाठी हाय हील्सची भूमिका वेगळी असते. हाय हील्स जास्त वेळ घातल्यास पाय दुखू लागतात. पण अनेक वेळा महिला स्मार्ट लूक मिळविण्यासाठी त्रास सहन करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. तुम्हीही या सणासुदीच्या (Festival) काळात स्मार्ट लुक मिळवण्यासाठी हाय हिल्स (High Heels) खरेदी करणार असाल तर या काही महत्त्वाच्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा. 

* पायांना मॉइश्चरायझ करा
हाय हील्स घालण्यापूर्वी पायांना मॉइश्चरायझेशन करावे. असे केल्याने चालताना त्रास कमी होईल. तुम्हाला चिडचिड होणार नाही.

* योग्य आकाराच्या हाय हिल्स
उंच टाचांचे सॅन्डल घालताना, पायांच्या आकारानुसार योग्य पादत्राणे न निवडल्यानेही वेदना होतात. म्हणून, कोणतेही पादत्राणे निवडण्यापूर्वी, एकदा आपल्या पायाचा आकार तपासून हाय हिल्स निवडावी.

high -heels
high -heelsDainik Gomantak
high heels
Vitamin C आरोग्यासाठी का आहे महत्त्वाचे? जाणून घ्या फायदे

* प्लॅटफॉर्म हील्स-
तुम्हाला स्टाइल तसेच आरामशीर कॅरी करायचे असेल, तर पॉइंटेड किंवा पेन्सिल हील्सऐवजी (Pencil-Heels) ब्लॉक हील्स आणि प्लॅटफॉर्म हील्स निवडा. हे पेन्सिल हील्सपेक्षा अधिक आरामदायक आहेत.

Pencil-Heels
Pencil-HeelsDainik Gomantak

या गोष्टीही उपयोगी पडतील
- उंच टाच घातल्यावर वेदना जाणवू नयेत यासाठी, तुम्ही तुमच्या काफ मसल्सला २ किंवा ३ स्ट्रेच केले पाहिजेत. तुम्ही हे दिवसाच्या कोणत्याही वेळी करू शकता. विशेषत: जेव्हा तुम्ही तासन्तास हाय हील्स घालून घराबाहेर पडत असाल.  

- दुसरे, तुम्ही तुमच्या मसल्सला आणि पायांना हलक्या हातांनी मसाज करू शकता.या व्यतिरिक्त, तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा फोम रोलरचा वापर करून तुमच्या पायांवर (Legs) मालिश करून आराम मिळवू शकता. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com