Ratna Shastra: 'या' राशीच्या व्यक्तींनी धारण करू नये नीलम, अन्यथा भोगावे लागेल भयंकर परिणाम

नीलम रत्न कोणत्या राशीसाठी ठरू शकतं फायदेशीर हे जाणुन घेउया.
Ratna Shastra
Ratna ShastraDainik Gomantak
Published on
Updated on

Ratna Shastra: आपले व्यक्तीमत्व आपल्या राशीवर अवलंबून असते. आपली रास आपल्याला आगामी काळातली संकट किंवा घडणाऱ्या चांगल्या गोष्टी यांच्याबाबत माहिती देत असते.

काही राशीं अशा असतात. ज्या राशींची स्थिती अनेकदा चांगली मानली जात नाही. मग त्या राशीच्या व्यक्तींना कामात अडथळे येणं, निराशा येणं किंवा हतबलता वाटणं असं पाहायला मिळतं.

यावर उपाय म्हणून ज्योतिष शास्त्रात एक जोड देण्यात आली आहे. ही जोड म्हणजे त्या राशींना उपयुक्त ठरणारी रत्न. ही रत्न त्या राशीतली स्थिती सुधारण्याचा प्रयत्न करतात. अशाच एका रत्नाबद्दल आपण बोलणार आहोत.

हे रत्न कोणत्या राशीच्या व्यक्तींनी घालावं याबाबतही माहिती या लेखात मिळणार आहे. पण असे जरी असले तरीही हे रत्न ज्योतिषांच्या सल्ल्यानेच धारण करावे असा सल्लाही आम्ही देत आहोत.

नीलम रत्न कोणत्या राशीसाठी ठरू शकतं फायदेशीर

शनीच्या राशी, कुंभ आणि मकर राशीच्या लोकांसाठी नीलम परिधान करणे फायदेसीर ठरु शकते. शुक्र राशीच्या व्यक्ती वृषभ आणि तूळ राशीचे लोक देखील नीलम परिधान करू शकतात.

या राशीच्या व्यक्तींनी नीलम घालणं टाळावं

  • मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी नीलम घालू नये असं सांगण्यात आलं आहे. मंगळ आणि शनि यांचं आपापसात पटत नाही. या राशीच्या व्यक्तींनी नीलम घातल्यास त्या व्यक्तीच्या आयुष्यातलं सुख नाहीसं होतं.

  • गुरूची रास धनु आणि मीन राशीने देखील नीलम परिधान करू नये. या राशीच्या व्यक्तींनी नीलम घातल्यास त्या राशीचं नशीब बिघडतं आणि त्या राशीच्या व्यक्तींच्या कामांमध्ये अडथळा येतो.

Ratna Shastra
Easter Sunday Recipe: चॉकलेट स्पंज केकसह बनवा ईस्टर संडे स्पेशल !
Stones
StonesDainik Gomantak
  • कर्क राशीत चंद्र आणि सिंह राशीत सूर्य असलेल्या लोकांनी नीलम धारण करू नये कारण शनीचे चंद्र आणि सूर्याशी वैर आहे.

  • बुधाची राशी मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांनी देखील नीलम घालू नये. कारण बुध आणि शनी क्वचितच एकत्र येतात.

  • शनि जर चढत्या, पाचव्या किंवा अकराव्या भावात असेल तर नीलम धारण करू नये.

  • शनीचा सूर्य, चंद्र, मंगळ यांच्याशी संयोग असल्यास त्या व्यक्तीने नीलम घालू नये

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com