Whatsapp Updates: आता स्टेटसमध्ये करू शकाल टॅग, व्हॉट्सॲपने लाँच केले भन्नाट फिचर

Whatsapp Updates: व्हॉट्सॲप यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. आता तुम्ही स्टेटसवर टॅग करू शकणार आहे.
Whatsapp Updates:
Whatsapp Updates:Dainik Gomantak
Published on
Updated on

WhatsApp working on wonderful feature you can tag in the status read details

मेटा-मालकीचे इन्स्टंट मॅसेजिंग ॲप व्हॉट्सॲप आपल्या युजर्ससाठी नवनवीन फिचर लाँच करत असते. आता अलिकडेच व्हॉट्सॲप एका फिचरवर काम करत आहे. या फिचरमुळे तुम्ही स्टेटसवर टॅग करू शकता. या फिचरचे नाव व्हॉट्सॲप स्टेटस फिचर असे नाव आहे. हे फिचर लाँच झाल्यानंतर अनेक लोकांना स्टेटस ठेवणे मजेदार वाटणार आहे.

व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये टॅग करता येईल

व्हॉट्सॲप एका नवीन फीचरवर काम करत आहे. हे फीचर आल्यानंतर तुम्ही तुमच्या स्टेटसमध्ये एखाद्याला टॅग करू शकाल. हे इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये आधीपासूनच आहे. त्याचप्रमाणे तुम्ही टॅग करू शकाल. तुम्ही तुमच्या स्टेटसमध्ये ज्याला टॅग कराल त्याला टॅग झाल्याची सूचना मिळेल.

सोप्या शब्दात, आपण ज्या व्यक्तीसाठी स्टेटस पोस्ट करता त्याला ते कोणत्याही परिस्थितीत पहावे लागेल. Wabetainfo ने व्हॉट्सॲपच्या या नवीन फीचरबद्दल माहिती दिली आहे.

नवीन फीचरची चाचणी व्हॉट्सॲप अँड्रॉइडच्या बीटा व्हर्जन 2.24.6.19 वर केली जात आहे. जर तुम्ही बीटा यूजर्स असाल तर तुम्ही हे फीचर पाहू शकता आणि वापरू शकता.

व्हॉट्सॲप आणखी एका प्रायव्हसी फीचरवर काम करत आहे. त्यानंतर प्रोफाईल फोटोचा स्क्रीनशॉट घेतला जाणार नाही. व्हॉट्सॲप यावर बंदी घालणार आहे. नवीन फीचर व्हॉट्सॲपच्या प्रायव्हसीचा भाग आहे.

असे म्हटले जात आहे की नवीन अपडेटनंतर, आपण एखाद्याच्या व्हॉट्सॲप प्रोफाइलचा स्क्रीनशॉट घेऊ शकाल, परंतु तो ब्लॅक असेल म्हणजेच फोटो दिसणार नाही. सध्या व्हॉट्सॲपच्या या फीचरची बीटा व्हर्जनवर चाचणी सुरू आहे. नवीन फीचर व्हॉट्सॲप अँड्रॉइडच्या बीटा व्हर्जन 2.24.4.25 वर दिसले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com