WhatsApp: आता यूजर्सची होणार नाही फसवणूक, व्हॉट्सअॅपमध्ये आलं खास फिचर

WhatsApp: व्हॉट्सअॅपमध्ये येणारे प्सॅम मॅसेजमुले अनेक लोकांची फसवणूक होते. पण आता असे होणरा नाही कारण व्हॉट्सअॅप नवे फिचर लाँच केले आहे.
WhatsApp
WhatsAppDainik Gomantak

whatsapp users block spam message sender lock screen

व्हॉट्सअॅपने एक नवीन फीचर लाँच केले आहे. यामुळे यूजर्स त्यांच्या लॉक स्क्रीनवरून थेट स्पॅम ब्लॉक करू शकतात. या अपडेटचे उद्दिष्ट स्पॅम मॅसेजच्या वाढत्या प्रकरणाला आळा घालणे आहे. व्हॉट्सॲपसारख्या मॅसेजिंग नेटवर्कसाठी स्पॅम मॅसेजेस हा अनेक दिवसांपासून चिंतेचा विषय बनला आहे.

व्हॉट्सॲपचे खास फिचर

स्पॅम मॅसेजमुळे यूजर्संना प्रचारात्मक कंटेंटपासून ते अफवा पसरवणाऱ्या बातम्यापर्यंत खूप त्रास होत आहे. जगभरातील अनेक युजर्स स्पॅम मॅसेजच्या माध्यमातून फसवणुकीचेही बळी ठरले आहेत. अशावेळी व्हॉट्सॲपचे हे फीचर खूप महत्त्वाचे आहे. असे स्पॅम मॅसेज टाळण्यासाठी व्हॉट्सॲपने एक नवीन फीचर लाँच केले आहे. ज्याद्वारे यूजर्स त्यांच्या लॉक स्क्रीनवरून स्पॅम मॅसेज ब्लॉक करू शकतात.

स्पॅम मॅसेजवर बंदी

हे फिचर लागू करण्यामागे व्हॉट्सअॅपचा उद्देश त्यांच्या यूजर्संना एक उत्तम मॅसेजिंग अनुभव प्रदान करणे तसेच त्यांची गोपनीयता आणि सुरक्षितता वाढवणे हा आहे. व्हॉट्सअॅपचे हे नवीन फिचर यूजर्संना त्यांचे डिव्हाइस अनलॉक न करता किंवा ॲपद्वारे नॅव्हिगेट न करता स्पॅम मॅसेज ओळखून ब्लॉक करता येणार आहे.

यूजर्संची फसवणूक होणार नाही

यूजर्संना व्हॉट्सॲपवर दररोज बरेच स्पॅम मॅसेज येत असतात. यामुळे यूजर्स केवळ मानसिकरित्या अस्वस्थ होत नाहीत तर काही वेळा खोट्या जाहिरातींना बळी पडतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन व्हॉट्सॲपचे हे फीचर युजर्ससाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com