WhatsApp Tips: बॅकअप न घेता व्हॉट्सअॅप चॅट कसे ट्रान्सफर कराल, जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

WhatsApp Tips: व्हॉट्सअॅप चॅट बॅकअप घेणे आता सोपे झाले आहे.
WhatsApp
WhatsAppDainik Gomantak

WhatsApp tips how to transfer WhatsApp chats without backup from google drive

आजकाल सर्वजण व्हॉट्सॲपचा वापर करतात. दुसऱ्या फोनवर व्हॉट्सॲप चॅट्स ट्रान्सफर करणे नेहमीच मोठे आणि कठीण काम राहीले आहे. जेव्हा आपल्याकडे योग्य आणि अचूक माहिती नसते तेव्हा असे होते. व्हॉट्सॲप चॅट बॅकअप घेणे आता मेटाने खूप सोपे केले आहे. आता तुम्ही बॅकअप न घेता तुमच्या व्हॉट्सॲप चॅट्स एका फोनवरून दुसऱ्या फोनवर ट्रान्सफर करू शकता.

  • QR कोड मदत करेल

काही दिवसांपूर्वी व्हॉट्सॲपने QR कोड आधारित चॅट ट्रान्सफर फीचर लाँच केले आहे. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचे संपूर्ण व्हॉट्सॲप चॅट्स हिस्ट्रीसह दुसऱ्या फोनवर ट्रान्सफर करू शकता. अशावेळी ट्रान्सफर करण्यापूर्वी तुम्हाला चॅटचा बॅकअप घेण्याची गरज नाही.

  • QR कोडद्वारे WhatsApp Chat कसे ट्रान्सफर कराल

सर्वात पहिले व्हॉट्सॲप अपडेट करावे.

यानंतर व्हॉट्सॲप ओपन करा आणि सेटिंगमध्ये जावे.

आता चॅटवर जा आणि ट्रान्सफर चॅट्सच्या ऑप्शनवर क्लिक करा.

आता Start वर क्लिक करा, Nearby Wi-Fi आणि लोकेशनला परवानगी द्या.

आता तुम्हाला एक QR दिसेल.

आता तुम्हाला नवीन फोनमध्ये देखील QR कोड दिसेल.

आता तुम्हाला जुन्या फोनवरून ट्रान्सफर चॅट्सचा ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा.

आता तुम्हाला थोडा वेळ थांबावे लागेल आणि चॅट ट्रान्सफर होतील.

  • क्यूआर कोडद्वारे व्हॉट्सॲप चॅट ट्रान्सफर करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

दोन्ही फोनमध्ये व्हॉट्सॲप इन्स्टॉल केलेले असावे. व्हॉट्सॲपची लेटेस्ट वर्जन असावे.

याशिवाय, दोन्ही फोन एकाच वाय-फाय नेटवर्कशी कनेक्ट असावे.

तुम्ही अशा प्रकारे Android वरून Android आणि iOS वरून iOS मध्ये चॅट्स ट्रान्सफर करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com