WhatsApp Updates: आता व्हॉट्सअ‍ॅपवर ग्रुप बनवणं होणार आणखी सोपं; कंपनीने आणलं खास फीचर! तुम्हाला मिळालं का?

व्हॉट्सअ‍ॅप आपल्या यूजर्ससाठी आणखा एक नवे फीचर आणले आहे.
WhatsApp Updates
WhatsApp UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

WhatsApp Updates: व्हॉटसअॅप आपल्या यूजर्ससाठी नवनवीन फीचर लाँच करत असते. मेटाचे सीईओ मार्क झुरबर्क यांनी व्हॉटसअॅप नव्या फीचरबद्दल मीहिती दिली आहे. या फीचररमुळे यूजर्सांना कोणत्याही नावाशिवाय ग्रुप तयार करता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया हे फीचर कसे काम करते.

फेसबुकवरील एका पोस्टमध्ये, मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले की, या फीचर उद्देश व्हॉट्सअॅप वापरायला सोपा व्हावा एवढाच आहे. पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, "जेव्हा व्हॉट्सअॅपवर ग्रुप बनवायचा आहे पण नाव काय ठेवावे हे समजत नसेल तर तुम्ही नाव न ठेवता देखील ग्रुप बनवू शकता.

जेव्हा तुम्हाला घाईत एखादा ग्रुप तयार करायचा असेल, आणि त्या ग्रुपसाठी एखादं नाव सुचत नसेल; त्या वेळी हे फीचर तुमच्या कामी येईल. सहा सदस्य असणाऱ्या ग्रुप्सना त्यात कोण-कोण आहे यावरुन आपोआप नाव दिलं जाईल.

WhatsApp Updates
Amazon Rakhi Store: टॉप ब्रॅण्डच्या 'Designer Rakhi' वर भरघोस डिस्काउंट

व्हॉट्सअॅपने स्पष्ट सांगितले आहे की या फीचरमुळे युजर्सची प्रायव्हेसी सुरक्षित राहिल. ग्रुपमध्ये असलेल्या लोकांची नाव तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह नसले तरी दिसतात पण या फिचरमुळे फक्त तुमचा मेबाईल नंबर दिसेल. या नव्या फीचरचा आनंद घेण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअॅपचे अपडेटेट व्हर्जन वापरावे लागेल.

गेल्या काही आठवड्यांमध्ये व्हॉट्सअॅप डेव्हलपर्सनी अॅपमध्ये अनेक नवीन फीचर्स लाँच केले आहेत. यामध्ये एचडी क्वालिटीमध्ये फोटो पाठवण्याचे फीचर लेटेस्ट आहे. तसेच युजर्स आता पाठवलेला मॅसेज एडिट करू शकतो. व्हॉट्सअॅपवर एचडी क्वालिटीमध्ये फोटो पाठवण्यासाठी यूजर्स आता चॅटवर जाऊन व्हॉट्सअॅपच्या इनबिल्ट कॅमेऱ्यातून फोटो क्लिक करून एचडी क्वालिटी सिलेक्ट करू शकतात. म्हणजेच व्हॉट्सअॅपवर फोटो ब्लर होणार नाहीत आणि यूजर्स त्यांच्या कुटुंबासह आणि मित्रांसह हाय क्वॉलिटीचे फोटो शेअर करू शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com