WhatsApp: व्हॉट्सॲपवरून 'असे' बुक करा मेट्रोचं तिकीट

तुम्ही व्हॉट्सॲपद्वारे मेट्रोचे तिकिटे अगदी सहजपणे बुक करू शकता आणि तिकीटाची प्रिंट न घेता फक्त व्हॉट्सॲप तिकीट दाखवून प्रवास करू शकता.
WhatsApp
WhatsAppDainik Gomantak

WhatsApp: दिल्ली मेट्रोने गेल्या वर्षीच व्हॉट्सॲपवर तिकीट बुक करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अनेकांना याची माहिती आहे पण अजूनही अनेकांना याची माहिती नाही. त्यामुळे आजही तिकीटांसाठी लांबच लांब रांगा असतात.

तुम्ही व्हॉट्सॲपद्वारे दिल्ली मेट्रोची तिकिटे अगदी सहजपणे बुक करू शकता आणि तिकीटाची प्रिंट न घेता फक्त व्हॉट्सॲप तिकीट दाखवून प्रवास करू शकता.

दिल्ली मेट्रोची व्हॉट्सॲप आधारित तिकीट सिस्टम हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये उपलब्ध आहे. हे संपूर्ण काम चॅटबॉटच्या माध्यमातून पूर्ण केले जाणार आहे. मेट्रो तिकीट बुक करण्यासाठी, तुमच्या फोनमध्ये +91-9650855800 नंबर सेव्ह करा.

कसे तिकिट कराल बुक

व्हॉट्स ॲपवर जा आणि 9650855800 वर 'Hi' पाठवा.

आता तुमची भाषा निवडा.

यानंतर “By Ticket” बटणावर क्लिक करा.

नंतर तुम्हाला जिथून प्रवास करायचा आहे त्या स्टेशनचे नाव टाका.

नंतर तुम्हाला ज्या स्टेशनवर जायचे आहे त्याचे नाव टाका.

यानंतर पेमेंट करा आणि तिकीट मिळवा.

तुम्ही एका वेळी जास्तीत जास्त 6 तिकिटे बुक करू शकता. तुम्हाला व्हॉट्सॲपवरच QR कोड असलेले तिकीट मिळेल. ही तिकीट बुकिंग सुविधा सर्व मेट्रो मार्गांसाठी सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत उपलब्ध आहे. एअरपोर्ट लाईनसाठी तिकीट बुकिंग पहाटे 4 ते रात्री 11 पर्यंत आहे. व्हॉट्सॲपद्वारे तिकीट काढल्यानंतर ते रद्द करता येणार नाही. UPI द्वारे पेमेंट करण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. कार्ड पेमेंटवर शुल्क आकारले जाऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com