Weight Loss साठी बेसन कि रवा काय फायदेशीर?

बेसन किंवा रवा यापैकी कोणता पदार्थ वजन कमी करण्यास मदत करते हे जाणून घेऊया
Weight Loss
Weight LossDainik Gomantak

तुम्ही सर्वांनी रवा आणि बेसनपासून बनवल्या पदार्थांचे सेवन केले असेल. डोसा, लाडू यांसारखे स्वादिष्ट पदार्थ बनवण्यासाठी बहुतेक लोक त्यांचा वापर करतात. रवा आणि बेसन हे दोन्ही अतिशय आरोग्यदायी अन्न मानले जाते. त्यामध्ये पौष्टिक घटकांचा खजिना असतो. रवा आणि बेसन दोन्ही खूप फायदेशीर आहेत.

वजन कमी करण्यासाठी तुम्ही बेसन आणि रवा दोन्ही खाऊ शकता, पण वजन कमी करण्यासाठी रवा खाणे चांगले की बेसन खाणे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. चला तर मग जाणून घेऊया दोनपैकी कोणते पदार्थ फायदेशिर आहे.

Weight Loss
Diet In Dengue: डेंग्यूत प्लेटलेट्स वाढवण्यासाठी करा आहारात या पदार्थांचा समावेश

संशोधन काय सांगते

अमेरिकेतील एका संशोधन अहवालानुसार, 100 ग्रॅम रव्यामध्ये 360 कॅलरीज असतात आणि त्याच प्रमाणात, बेसनमध्ये 387 कॅलरीज असतात. अशा प्रकारे, रवा आणि बेसन दोन्ही कॅलरीजच्या बाबतीत वजन कमी करण्यास उपयुक्त आहेत.

वजन कमी करण्यासाठी रव्याचे फायदे

जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुम्ही रव्याचे सेवन करू शकता. रव्यामध्ये भरपूर फायबर असते, जे शरीरातील वजन कमी करण्यासाठी आवश्यक पोषक असते. तुमच्या आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश केल्याने तुमचे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

ज्यामुळे तुम्ही पुन्हा पुन्हा खाणे टाळता. रव्यामध्ये कॅल्शियम, प्रोटीन, मॅग्नेशियम असे अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आढळतात. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. रव्याचे इतरही अनेक फायदे आहेत. रवा शरीरात रक्ताची कमतरता होऊ देत नाही. गरोदरपणात महिलांना (Women) रव्याचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

* वजन कमी करण्यासाठी बेसनाचे फायदे

बेसनाचे नियमित सेवन केल्याने शरीरात चरबी जमा होत नाही, त्यामुळे वजन वाढत नाही. बेसनमध्ये फायबर देखील असते. जे वजन कमी करण्यासाठी आवश्यक पोषक आहे. तसेच बेसनामध्ये असलेली जीवनसत्त्वे आणि खनिजे वजन वाढू देत नाहीत. आहारात बेसनाचा समावेश केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. बेसन तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता होऊ देत नाही. बेसन हे निरोगी शरीर आणि हाडांसाठीही खूप महत्वाचे आहे. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर बेसनाचे पीठ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

* बेसन आणि रवा यात काय चांगले आहे?

रव्यामध्ये ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो. यासोबतच ग्लूटेनची पातळीही वाढली आहे. ज्यामुळे ग्लूटेनची चिंता असलेल्या लोकांसाठी ते हानिकारक ठरू शकते. दुसरीकडे, बेसनाबद्दल बोलायचे झाल्यास, बेसनाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि बेसन ग्लूटेनमुक्त असते. याशिवाय बेसनामध्ये प्रथिनांचे प्रमाणही चांगले असते. मधुमेहाचे रुग्ण आणि ज्यांना ग्लुटेनची ऍलर्जी आहे त्यांनी रव्याचे सेवन टाळावे, असे तज्ज्ञांचे मत आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी बेसनाचे सेवन हा उत्तम पर्याय असू शकतो. तसे, वजन कमी करण्यासाठी तुम्ही रवा आणि बेसन दोन्ही वापरू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com