Weekend Trip: वीकेंडला ट्रिप प्लॅन करताय? मग 'या' गोष्टी ठेवा लक्षात

वीकेंड ट्रीपचे योग्य प्लॅनिंग केले नसेल तर तुम्हाला ओव्हरबजेट तर होतेच, पण ट्रिपदरम्यान तुम्हाला समस्यांनाही सामोरे जावे लागते.
Weekend Trip
Weekend TripDainik Gomantak

Weekend Trip: आठवडाभर काम करून शनिवार आला की कुठेतरी बाहेर जावंसं वाटतं. कामाचा ताण आणि थकवा दूर करण्यासाठी छोटी ट्रिप प्लॅन करणे गरजेचे असते. तुमच्याकडे प्रवासासाठी फक्त दोनच दिवस असल्याने योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. 

वीकेंड ट्रीपचे योग्य प्लॅनिंग केले नसेल तर तुम्हाला ओव्हरबजेट तर होतेच, पण ट्रिपदरम्यान तुम्हाला समस्यांनाही सामोरे जावे लागते. इतकंच नाही तर कधी-कधी दुसऱ्या दिवशी कामावरून सुटीही घ्यावी लागते. तुमच्यासोबत असे काहीही होणार नाही याची खात्री करण्यासाठी तुम्ही वीकेंड ट्रिपचे योग्य प्लॅनिंग केले पाहिजे. 

  • बजेट ठरवावे

वीकेंड ट्रिप प्लॅनिंगमधला हा पहिला आणि महत्त्वाचा टप्पा आहे. जेव्हाही तुम्ही वीकेंड ट्रिपला जाण्याचा विचार करत असाल, तेव्हा सर्वात आधी तुमचे बजेट सेट करावे. वीकेंड ट्रिपसाठी तुम्ही किती पैसे खर्च करू शकता हे एकदा तुम्हाला कळले की, तुमच्यासाठी ठिकाण आणि हॉटेल बुक करणे सोपे होते.

  • ठिकाण ठरवावे

एकदा तुम्ही बजेट सेट केल्यानंतर तुम्ही ठिकाण निवडले पाहिजे. यामुळे तुम्हाला प्रवासात जास्त वेळ वाया जाणार नाही. वीकेंड ट्रीपला जाताना याची काळजी घेणे अधिक महत्त्वाचे ठरते. एवढेच नाही तर तुम्ही ज्या ठिकाणी जाण्याचा विचार करत आहात त्या ठिकाणी कार, बस किंवा ट्रेनने कनेक्टिव्हिटी असल्यास अधिक चांगले होईल. यामुळे तुम्हाला प्रवास करणे खूप सोपे होईल.

Weekend Trip
Fengshui Tip For Home: घरात आनंद अन् शांती हवीय? मग असे सजवा घर
  • योग्य पॅकिंग

वीकेंड ट्रीपला जात असताना फक्त दोन दिवसांचे सामान घेऊन जावे. गरज नसलेल्या वस्तू सोबत घेऊन जाऊ नका. जेणेकरून प्रवास आनंदी होईल.

  • स्नॅक्ससोबत ठेवावे

वीकेंड ट्रिपमध्ये तुम्ही काही स्नॅक्स सोबत घेऊ जाऊ शकता. घरातील पदार्थ सोबत नेल्यास बाहेरचे पदार्थ खावे लागणार नाही. तसेच यामुळे तुम्ही आजारी देखील पडणार नाही. तुमचा खर्च देखील वाचेल.

  • कार्यक्रम चेक करावे

वीकेंड ट्रिपला जाण्यापूर्वी तिथे होणारे कार्यक्रम, सण किंवा इतर उपक्रम चेक करावे. यामुळे तुमची ट्रिप अविस्मरणीय होईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com