Paneer Chole: 'या' वीकेंडला पनीरला द्या ट्विस्ट अन् बनवा स्वादिष्ट छोले

ही रेसिपी लहान मुले आणि मोठे दोघांनाही नक्की आवडेल.
Weekend Special Recipe:
Weekend Special Recipe: Dainik Gomantak

Weekend Special Recipe: या वीकेंडला तुम्ही टेस्टी आणि स्पायसी पदार्थ खायचा विचार करत असाल तर आम्ही तुम्हाला एक खास पदार्थ सांगणार आहोत. विशेषत: वीकेंडला खास बनवण्यासाठी लोक वेगवेगळे डिशेस ट्राय करतात.

तुम्हालाही वीकेंडला एखादा चविष्ट पदार्थ ट्राय करायचा असेल तर पनीरसोबत छोले बनवा. काळे किंवा पांढरे चणे सोबत पनीर मिक्स करुन बनवल्याने याची टेस्ट डबल होते. ही पंजाबी स्टाईल रेसिपी बनवायला खूप सोपी आहे. चला तर मग जाणून घेउया पनीरच्या ट्विस्टसोबत छोले कसे बनवावे.

  • पनीर छोले बनवण्यासाठी लागणारे साहित्य

- काळे चणे किंवा काबुली चणे - १०० ग्रॅम

- पनीरचे तुकडे - १०० ग्रॅम

- बारीक चिरलेला कांदा - १

- टोमॅटो - ३ -४

- हिरवी मिरची - २

- कोथिंबीर

- काजू - १०० ग्रॅम

- धने पावडर - १ चमचा

- लाल तिखट - १ चमचा

- हळद - अर्धा चमचा

- भाजीचा मसाला - १ चमचा

- छोले मसाला - १ चमचा

- हिंग - १ चिमूटभर

- गरम मसाला - १/४ चमचा

- आमचूर पावडर - १ चमचा

- लवंग

- जिरे

- तमालपत्र

- देशी तूप

- तेल

- मीठ चवीनुसार

Weekend Special Recipe:
Hair fall Remedies : या घरगुती गोष्टी म्हणजे केसगळतीवर रामबाण उपाय! एकदा नक्की करून पहा
  • पनील छोले बनवण्याची कृती

पनीर छोले बनवण्यासाठी आधी काळे हरभरे किंवा काबुली चणे रात्रभर पाण्यात भिजवा. दुसऱ्या दिवशी दोन ते तीन पाण्याने चांगले धुवून घ्या. आता कुकरमध्ये दोन ते तीन शिट्टी घेऊन उकळवा. टोमॅटो कापून मिक्सीच्या जारमध्ये ठेवा. त्यात काजू आणि हिरव्या मिरच्या घाला.

तिन्ही गोष्टी बारीक करून पेस्ट बनवा आणि एका भांड्यात काढून ठेवा.आता एका कढईमध्ये तेल गरम करा. गरम तेलात जिरे टाका. त्यासोबत लवंग, तमालपत्र, दालचिनी घाला. नंतर त्यात लसूण व बारीक चिरलेला कांदा घालून परता.

चांगले परतून झाल्यावर टोमॅटो घाला. हळद, धणे पावडर, लाल मिरची आणि गरम मसाला घालून परता. आता छोले मसाला किंवा भाजी मसाला टाका. मंद आचेवर भाजताना चिरलेली हिरवी मेथीची पाने घाला. चवीनुसार मीठ घालून शिजवलेले हरभरे घाला.

थोडा वेळ शिजू द्या आणि बटर घालून ग्रेव्हीला रिच बनवा. शेवटी पनीर तळून त्याचे लहान तुकडे करा. आणि ते ग्रेव्ही मध्ये टाका. तुमचे टेस्टी पनीर छोले तयार आहे. कोथिंबीरने गार्निश करुन पोळी किंवा पराठा सोबत सर्व्ह करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com