Somvar Upay: सोमवारी हा महादेवाला समर्पित आहे. आठवड्याचा पहिला दिवस असल्याने तुम्हाला काहीही अडथळे येत असतील किंवा तुमची काही इच्छा अपूरी राहात असेल तर सोमवारी महादेवाला प्रसन्न करण्याचे काही उपाय आहेत.
देवांचा देव असले तरी महादेव भोलेनाथही आहेत. त्यामुळे तुम्ही योग्य प्रकारे शिवशंकराची पूजा केली तर भगवान शंकर तुम्हाला प्रसन्न होऊन आशिर्वाद देतील. सोमवारी कोणते उपाय करावेत हे जाणून घेउया.
सोमवारी बेलपत्रावर चंदन लावून आपली इच्छा सांगावी आणि हे बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करावे. तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा उपाय सर्वोत्तम मानला जातो.
सोमवारी महादेवाची पूजा करताना ओम नम: शिवाय मंत्राचा जप करावा. असे केल्याने घरात धनाचा वर्षाव होईल तसेच व्यवसायात वाढ होईल.
सोमवारी सकाळी स्नान करून महादेवाची पूजा करावी. पूजेच्या वेळी गंगाजल असलेले जल अर्पण करावे. फुले अर्पण करा. चंदनाने टिळा लावावा. तुपाचा दिवा लावावा. हात जोडून तुमची इच्छा मागावी. महादेव तुमची इच्छा पूर्ण करतील.
महादेवाला पांढरे फुल अर्पण करावे.
सोमवारी भगवान शिवाची पूजा करताना शिव चालीसा आणि शिवाष्टकांचे पठण करा. हा उपाय केल्याने भगवान शिव तुमच्या मनोकामना पूर्ण करतात.
सोमवारी शिवमंदिरात गौरी शंकराला रुद्राक्ष अर्पण केल्याने विवाहातील सर्व अडथळे दूर होतात.
जर तुमच्या आयुष्यात पैशाशी (Money) संबंधित समस्या येत असतील तर सोमवारी शिव मंदिरात रुद्राक्ष अर्पण करा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.