Watermelon In Summer: उन्हाळ्यातील सुख म्हणजे कलिंगड

Watermelon In Summer: दात रुतवण्यासारखे अमाप सुख ज्यात आहे असे कलिंगडासारखे दुसरे काही नसेल आणि या कामाला उन्हाळ्याइतका योग्य मोसमही नसेल.
Watermelon In Summer
Watermelon In SummerDainik Gomantak
Published on
Updated on

Watermelon In Summer:

दात रुतवण्यासारखे अमाप सुख ज्यात आहे असे कलिंगडासारखे दुसरे काही नसेल आणि या कामाला उन्हाळ्याइतका योग्य मोसमही नसेल. अंगाची काहिली होत आहे, तहान गळ्यावर सुरी ठेवून आहे अशावेळी जर कलिंगडाच्या कापलेल्या लालजर्द शीरा जर कुणी बशीतून समोर केल्या तर वणव्याच्या अंगाला पायाखाली हिरवळ आल्यासारखे सुख होते.

सर्वसामान्यांच्या खिशाला उन्हाळयाच्या दिवसात परवडणारे आणि शोषावर उतारा ठरणारे फळ कुठले असेल तर ते या दिवसात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेले कलिंगडच आहे. लालेलाल, रसदार आणि चविष्ट असा कलिंगडाचा गर फक्त तहान-भुकेसाठी उपयुक्त नाही तर त्याचे इतरही अनेक फायदे आहेत.

खरे तर कलिंगड आता वर्षभर बाजारात दिसते पण उन्हाळ्यात (एप्रिल ते मे-जूनपर्यंत) ते उत्तम विविधतेने उपलब्ध असते. गोव्यातील रस्त्यांवर तर बाजूच्या शेतांमध्ये पिकवली गेलेली स्थानिक कलिंगडे हिरव्या राशीनी या दिवसात खुणावत असतात. उन्हाळ्यात शरीराला पाण्याची तीव्र आवश्‍यकता भासते कारण या दिवसात घामाद्वारे शरीरातील पाण्याचा निचरा सतत होत असतो.

Watermelon In Summer
Dolphin In Goa: गोव्यात आढळणाऱ्या डॉल्फिनच्या दोन प्रजाती धोक्यात !

साधे पाणी देखील अशावेळी खरेतर डिहायड्रेशनने ग्रासलेल्या शरीराला उपायकारक बनू शकते. पण फक्त साधे पाणी पित राहणे हे कधीकधी थोडे कंटाळवाणे बनू शकते. अशावेळी कलिंगडाचे सेवन हा तहानेवरचा स्वादिष्ट आणि ग्लॅमरस उपाय  बनू शकतो. कलिंगडामध्ये भरपूर पाणी असते.

इतकेच नव्हे ते शरीराला आतून थंड ठेवते व ज्यामुळे उष्माघातासारख्या धोका टाळला जाऊ शकतो. कलिंगडामध्ये पोटॅशियम आणि ए, बी आणि सी ही जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात. कलिंगडामधील लाल रंग हा ‘लाइकोपीन’ नावाच्या ॲंटीऑक्सिडंटमधून येतो.

Watermelon In Summer
Goa Politics: श्री महालक्ष्मीची ओटी भरून, पल्लवी धेंपे झाल्या राजकारणात सक्रीय    

कलिंगडामध्ये अनेक वनस्पती संयुगे आढळतात ज्यामुळे कर्करोगाचा धोका देखील बऱ्याच  प्रमाणात कमी होऊ शकतो.

कलिंगडामध्ये 92 टक्के पाणी असते आणि त्यात कॅलरी आणि चरबीचे प्रमाण खूप कमी असते त्यामुळे कलिंगड खाऊन पोट बऱ्यापैकी भरले तरी ते शरीरात चरबी वाढू देत नाही.

आपल्या शरीराचे वजन देखील त्यामुळे नियंत्रित  राहण्यास मदत होते. त्याशिवाय कलिंगडाच्या पाण्यात असलेले फायबर पचनास मदत करणारे असतात.

कलिंगडामध्ये असलेले अमिनो ऍसिड सिट्रलिन रक्तवाहीन्यांना  आराम देते व त्यांना विस्तारण्यास मदत करते.

मात्र कलिंगड खाताना काही काळजी मात्र अवश्‍य घ्यायला हवी. दिवसभरात ४००-५०० ग्रॅमपेक्षा ते अधिक खाल्ल्यास पोटाचे विकार संभवू शकतात.

रात्रीच्या वेळी तर कलिंगड खाणे टाळाच कारण रात्रीच्या वेळी आपल्या शरीराची पचनक्रिया मंदावलेली असते अशावेळी कलिंगडातील शर्करेमुळे रक्तातील  साखरेचे प्रमाण वाढू शकते व पर्यायाने वजन वाढू शकते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com