मॉर्निंग वॉकनंतर दह्यासह करा 'या' 4 पदार्थांचा समावेश

Morning Walk Diet Tips: फिटनेस राखण्यासाठी वर्कआऊटसोबतच डाएटवरही लक्ष देणं खूप गरजेचं आहे.
Morning Walk Diet Tips
Morning Walk Diet TipsDainik Gomantak

फिट राहण्यासाठी माणूस काय काय करत नाही, कधी जिममध्ये तासनतास घाम गाळतो तर कधी फिरायला जाणे, वर्कआउट (Workout) काहीही असो, पण फिट राहण्यासाठी तुम्हाला डाएटकडे लक्ष द्यावेच लागते. वर्कआऊट किंवा मॉर्निंग वॉकनंतर दिवसभर अॅक्टीव राहण्यासाठी कोणत्या 5 पदार्थांचे सेवन करावे ते जाणून घेऊया. (Morning Walk Diet Tips News)

* ओट्स

मॉर्निंग वॉक झाल्यानंतर ओट्स (Oats) खावे. ओट्समध्ये असलेले कार्बोहायड्रेट, फायबर, प्रथिने इत्यादी पोषक तत्वे असल्यामुळे पोट भरून राहते. त्यामुळे जास्त भुक लागत नाही.

* सुका - मेवा
ओट्स प्रमाणे प्रथिने, जीवनसत्त्वे आणि इतर अनेक खनिजे देखील असतात, जे शरीराला ऊर्जा देतात आणि व्यक्तीला अनेक आजारांपासून दूर ठेवतात. ड्रायफ्रुटचे (Dry Fruits) सेवन ओटमील, कॉर्नफ्लेक्स इत्यादीमध्ये टाकूनही करू शकता.

* फळे
मौसमी फळांचे (Fruits) सेवन शरीरासाठी खूप महत्त्वाचे असते. त्यांचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते. अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि इतर खनिजेही मिळतात. एवढेच नाही तर त्यांचे सेवन केल्याने तुम्हाला योग्य प्रमाणात फायबरही मिळते.

Morning Walk Diet Tips
Remedies For Constipation: पोट होईल लगेच साफ फक्त करा 'हे' 5 घरगुती उपाय

* मोड आलेले कडधान्य
मोड आलेले कडधान्य खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे. यासाठी डाळी रात्रभर भिजत ठेवा. त्यानंतर सकाळी मॉर्निंग वॉकनरून (Morning Walk) आल्यावर ते खा. हरभरा खाल्ल्याने तुम्हाला ऊर्जा तर मिळतेच पण फायबरही मिळते. यामुळे तुमची पचनसंस्था देखिल चांगली राहील.

* दही
मॉर्निंग वॉकनंतर दह्याचाही (Curd) आहारात समावेश करावा. दह्यामध्ये असलेले प्रोटीन पोटासाठी फायदेशीर ठरते. यासोबतच याचे सेवन केल्याने चयापचय क्रियाही वाढते. मॉर्निंग वॉकनंतर दही खाल्ल्याने वजनही कमी होण्यास मदत मिळते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com