अनेक लोकांकडून तुम्ही ऐकले असेल की जेवणानंतर लगेच पाणी पिऊ नये. कारण असे केल्यास त्याचा आरोग्यावर विपरित परिणाम होतो. अनेक लोकांना जेवणानंतर लगेच पाणी पिण्याची आहे. असे न करता तुम्ही साधारण अर्ध्या तासानंतर पाणी प्यावे. परंतु तुम्हाला माहित आहे का की याचा तुमच्या पचनसंस्थेवर किती वाईट परिणाम होत आहे. या व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही जेवण खाल्यावर पाणी पिणे बंद कराल.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, तो सुप्रसिद्ध शिक्षक आशु घई यांचा आहे. आशु सर या नावाने प्रसिद्ध असलेले आशु घई यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी जेवण केल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास काय होते हे सांगितले आहे. जेवण केल्यानंतर लगेच पोटभर पाणी प्यायल्याने पचनकसंस्था खराब होते आणि अन्न पचायला वेळ लागतो. जसजसा वेळ जातो तसतशी तुमची ही सवय तुमच्यासाठी त्रासदायक ठरू शकते.
जेवण केल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने होणारे नुकसान लोकांना समजण्यासाठी एक बरणी आणि बीकर घेतला आहे. पचन एंझाइमशी संबंधित रसायने बीकरमध्ये टाकली आहेत आणि ती पाण्यात मिसळून पातळ केली गेली नाहीत, तर बरणीत हे द्रावण घेऊन पाणी घालून पातळ केले गेले आहे. यानंतर, त्या दोन्हीमध्ये ब्रेडचे काही तुकडे टाकले जातात. व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की बीकरमधील ब्रेडचा तुकडा जळू लागतो तर बरणीमधील पोटाचा तुकडा अगदी तसाच राहतो. या प्रयोगाद्वारे तुम्हाला हे समजावण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे की पाण्यामुळे पाचक एंझाइम लगेच पातळ होतात आणि त्यामुळे पचनक्रिया मंदावते.
शरीराला पोषण मिळत नाही
जेवण केल्यानंतर लगेच खूप तहान लागली असेल, तर तुम्ही काहीतरी मसालेदार खाऊ शकता किंवा फिरू शकता. खूप तहान लागल्यास दोन-तीन घोट पाणी पिता येईल. पण पाणी थोडे कोमट असावे. अनेक अभ्यासांमध्ये असे आढळून आले आहे की गॅस्ट्रिक रिकामे होण्यासाठी 3 ते 7 तास लागतात. अन्न 7 तास लहान आतड्यात राहते. जे लोक जेवणानंतर लगेचच जास्त पाणी पितात ते लठ्ठपणाचे शिकार होतात. अनेक वेळा जेवण केल्यानंतर लगेच जास्त पाणी प्यायल्याने लोकांना गॅसची तक्रार होऊ शकते. जेवल्यानंतर लगेच पाणी प्यायल्याने शरीर त्यातील पोषक तत्वे योग्य प्रकारे शोषू शकत नाही, त्यामुळे शरीराला पोषक घटकांचा अभाव जाणवतो.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.