Dining Room: घरात डायनिंग रूम कोणत्या दिशेला असावी? वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं

वास्तुशास्त्रात डायनिंग रूमला महत्त्वाचं स्थान मानलं जातं.
Vastu Tips For Dining Room
Vastu Tips For Dining RoomDainik Gomantak
Published on
Updated on

Dining Room: वास्तुशास्त्रात डायनिंग रूमला महत्त्वाचं स्थान आहे. वास्तुस्शास्त्रातही स्वयंपाकघर कुटुंबाच्या सुखाशी निगडीत आहे आणि असं मानलं जातं की घराच्या प्रमुखाने जेवणाच्या टेबलावर एकत्र जेवण केल्यास, त्यामुळे कौटुंबिक नातं अधिक घट्ट होण्यास मदत मिळते. इतकेच नाही तर आरोग्यही सुधारते. यामुळेच डायनिंग रूम स्वयंपाकघराला लागून किंवा स्वयंपाकघरातच ठेवणे चांगले मानले जाते. चला तर मग जाणून घेऊया आपल्या डायनिंग रूम कोणत्या दिशेला असावी.

  • योग्य जागा

डायनिंग रूम तुमच्या घराच्या पश्चिम किंवा पूर्व दिशेला असणे शुभ मानले जाते. यामुळे आरोग्य चांगले राहते आणि पचन सुरळित कार्य करते. डायनिंग रूम तुमच्या घराच्या मध्यभागी किंवा बेडरूमजवळ ठेवणे टाळा.

  • डायनिंग टेबल

डायनिंग रूमच्या मध्यभागी डायनिंग टेबल ठेवावा. त्याभोवती चालता येईल अशी पुरेशी जागा सोडावी. ते भिंतीसमोर ठेवणे टाळावे. कारण यामुळे ऊर्जेचा प्रवाह थांबू शकतो.

Vastu Tips For Dining Room
Happy Marriage Life Tips: 'या' वास्तू टीप्स फॉलो करा अन् जोडीदारासोबतचे बंध नव्याने घट्ट करा...

आकार आणि रंग

चौरस किंवा आयताकृती डायनिंग टेबल घरात ठेवावा. कारण ते स्थिरता आणि संतुलन दर्शवते. डायनिंग टेबलसाठी हिरवा, पिवळा किंवा लाइट निळा रंग सिलेक्ट करावा. कारण हे रंग सुखदायक असतात.

लाइट

दिवसा जेवणाच्या ठिकाणी भरपूर नैसर्गिक प्रकाश असावा. संध्याकाळी, आरामदायी आणि आकर्षक माहोल तयार करण्यासाठी मंद प्रकाश वापरावा.

  • एकत्र जेवण

जेव्हा शक्य असेल तेव्हा डायनिंग टेबलवर एकत्र जेव करावे. वास्तूशास्त्रानुसार जेवणादरम्यान कौटुंबिक संबंधांना प्रोत्साहन देते. जे मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

तुमच्या डायनिंग रूममध्ये वरील वास्तु टिप्सचे पालन करून तुम्ही एक अशी जागा तयार करू शकता जी तुमच्या जेवणाची चव वाढवेल.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com