Vastu Tips: घरात असलेल्या 'या' गोष्टीमुळे घरात येऊ शकते दारिद्र्य

घरातील खराब वस्तू घरात ठेवल्यास दोष निर्माण होउ शकतो.
Vastu Tips
Vastu TipsDainik Gomantak
Published on
Updated on

घरातील विद्युत उपकरणे आणि पाण्याचे नळ खराब होणे हे अगदी सामान्य आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, किचन-बाथरूमचे नळ किंवा ट्यूबलाइट आणि बल्ब वारंवार खराब होत असतील, तर त्यांकडे दुर्लक्ष करु नका. घरातील अशा वस्तू खराब होणे ग्रह दोषांशी संबंधित समस्या दर्शवते. 

  • विजेच्या वस्तू खराब होणे


घरातील विजेच्या वस्तू सतत खराब होत राहिल्यास किंवा बल्ब आणि ट्यूब लाईट पुन्हा-पुन्हा फ्युज उडत असल्यास घरात समस्या निर्माण होउ शकतात. यामुळे अपघाताची शक्यता वाढते. वाहन चालवताना तुमचा अपघात होऊ शकतो. घरातील मुख्य ठिकाणी लाल स्वस्तिक लावा आणि घाण साचू देऊ नका.

  • स्वयंपाकघर आणि बाथरूमच्या नळांचे खराब पाणी

मुख्यतः चंद्र आणि शुक्राशी संबंधित आहे. काही प्रमाणात त्याचा संबंध मंगळाशीही आहे. स्वयंपाकघर, स्नानगृह किंवा घरातील इतर कोणत्याही ठिकाणी नळातून पाणी टपकत असेल तर ते अत्यंत अशुभ मानले जाते.

घरातील सिंक किंवा बाथरूमच्या नळातून टपकणाऱ्या पाण्याच्या प्रत्येक थेंबात नकारात्मक ऊर्जा राहते. पाणी वाया घालवणे किंवा वाहून नेणे चांगले मानले जात नाही. 

Vastu Tips
MahaShivratri 2023: महाशिवरात्रीपूर्वी 'या' दोन प्रमुख ग्रहांच्या संयोगाने मिळणार 'या' 3 राशींना लाभ
  • घरात प्रत्येक विषयावर भांडण

विनाकारण घरात पुन्हा पुन्हा भांडण होत असेल तर वादविवाद इतका वाढतो की नाते तुटण्याची शक्यता असते. जर सदस्यांमध्ये मतभेद वाढत असतील तर समजा मंगळाची स्थिती तुमच्या कुटुंबासाठी चांगली नाही. घरातील सदस्यांभोवती तणावाचे वातावरण असते. यासाठी घरात पुरेसा सूर्यप्रकाश मिळण्याची व्यवस्था करा.

  • घरात आजारी व्यक्ती असणे

घरात कोणीतरी आजारी राहत असेल घरचा सगळा पैसा औषधांवर खर्च होत आहे. जर लोक विनाकारण आजारी पडत असतील तर समजा सूर्याचा प्रभाव घरात कमजोर आहे. अशा स्थितीत रोज सकाळी घरी गायत्री मंत्राचा 108 वेळा जप करावा. दोन्ही वेळेस अन्न शिजल्यानंतर प्रथम ते देवाला अर्पण करावे.

  • मन उदास असणे

घरातील वातावरण जड वाटत असेल तर समजा घर नकारात्मक उर्जेने भरलेले आहे. तुमचा बृहस्पति कमकुवत आहे आणि घरात शुभ भाग कमी होत आहे.  रोज संध्याकाळी घरातील पूजेच्या ठिकाणी दिवा लावावा. संपूर्ण घरात अगरबत्ती किंवा धुप लावावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com