Vastu Tips: पोळपाट-लाटणे खरेदीचा असतो शुभ मुहूर्त

kitchen Tips: पोळपाट-लाटणे वापरण्याबाबत वास्तुशास्त्रामध्ये खास नियम सांगितले आहेत.
Roti Maker
Roti MakerDainik Gomantak
Published on
Updated on

Kitchen Tips: वास्तुशास्त्रावर विश्वास ठेवायचा झाल्यास घरातील स्वयंपाकघराचा थेट संबंध कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याशी असतो. यामुळे स्वयंपाकघरात ठेवलेल्या वस्तू आणि त्या ठेवण्याची जागा देखील खूप महत्वाची आहे. असे मानले जाते की, स्वयंपाकघरात ठेवलेल्या वस्तूंची जागा व्यवस्थित ठेवली नाही तर घरामध्ये वास्तुदोष निर्माण होऊ लागतात.

घराच्या स्वयंपाकघरात (kitchen) सर्वात जास्त वापरली जाणारी वस्तू म्हणजे पोळपाट-लाटणे. वास्तुशास्त्रातही पोळपाट लाटण्याबाबत अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चला जाणून घेऊया त्याच्याशी संबंधित काही खास गोष्टी.

घरामध्ये वापरण्यात येणारे पोळपाट-लाटणे कोणत्या दिवशी खरेदी करावे? कोणत्या दिवशी टाळावे याविषयी वास्तुशास्त्रात सांगितले आहे. वास्तुशास्त्रानुसार (Vastu Tips) जर तुम्ही नवीन पोळपाट- लाटणे घेणार असाल तर, यासाठी बुधवारचा दिवस खूप शुभ मानला जातो.

Roti Maker
Healthy Food: हेल्दी फूड टेस्टी बनवण्यासाठी फॉलो करा 'या' 5 टिप्स

वास्तुशास्त्रानुसार हे लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे की, मंगळवार किंवा शनिवारी कधीही नवीन पोळपाट-लाटणे खरेदी करू नये. ते वापरल्यानंतर नीट स्वच्छ करणे गरजेचे आहे. पोळपाट- लाटणे वापरल्यानंतर ते कधीही उलटे ठेवू नका.

तसेच ते धान्याच्या डब्यावर ठेवू नये. असे केल्याने गरिबी वाढते असे मानले जाते. वास्तुशास्त्रात असे सांगितले आहे की, पोळी बनवताना किंवा पोळपाट-लाटणे वापरताना त्याचा आवाज कधीही ऐकू नये. वास्तुशास्त्रात हे शुभ मानले जात नाही. यासोबतच तुटलेले पोळपाट-लाटणे वापरू नये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com