Vastu Tips: घरात औषधं ठेवण्याची योग्य जागा कोणती? वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं

घरात चुकीच्या दिशेने ठेवलेल्या वस्तूंमुळे वास्तू दोषही निर्माण होतात.
Vastu Tips
Vastu Tips Dainik Gomantak
Published on
Updated on

Vastu Tips:  चांगले आणि निरोगी आरोग्य ही जीवनातील सर्वात मोठी संपत्ती आहे असे म्हटले जाते. जर एखाद्या व्यक्तीचे शरीर निरोगी असेल तर तो जीवनातील सर्वात सुखी व्यक्ती समजला जातो. जीवनातील अनेक गोष्टींचा आनंद घेऊ शकतो, परंतु तुमची तब्येतच जर खराब असेल तर सर्व जगाचे सुखही त्याच्या मनातून निघून जाते. तो व्यक्ती आनंद देऊ शकत नाही. 

व्यक्तीला त्याच्या आजारपणामुळे दुःखी आणि चिंताग्रस्त राहण्यास भाग पाडले जाते. तुमची लाइफस्टाइल , खाण्यापिण्याच्या सवयी आणि वास्तुदोष ही तुमच्या खराब आरोग्याची कारणे आहेत. घरात चुकीच्या दिशेने ठेवलेल्या वस्तूंमुळे वास्तू दोषही निर्माण होतात. यापैकी एक म्हणजे औषधे चुकीच्या दिशेने ठेवणे. औषधे चुकीच्या दिशेने ठेवल्यास वास्तुदोष निर्माण होऊ शकतो.  त्यामुळे घरातील कोणीतरी आजारी राहतो. 

वास्तुशास्त्रानुसार घरात चुकीच्या ठिकाणी ठेवलेल्या औषधांचा घरातील लोकांच्या आरोग्यावरच परिणाम होत नाही तर लोक नेहमी कोणत्या ना कोणत्या आजाराला बळी पडतात. तुमच्याकडेही औषधे असतील तर ती योग्य ठिकाणी ठेवा. असे न केल्याने घरामध्ये रोगराई राहते. पसरू शकते.

योग्य दिशा कोणती

घरामध्ये कधीही उत्तर आणि पश्चिम दिशेला औषधे ठेवू नका. या दिशेला औषधे ठेवल्याने औषधांचा प्रभाव खूपच कमी होतो. औषधे दक्षिण-पूर्व किंवा दक्षिण दिशेला ठेवण्याची चूक कधीही करू नका. त्यामुळे घराघरात रोगराई कायम राहते. याशिवाय स्वयंपाकघरातही औषधे ठेवू नका. यामुळे वास्तुदोष निर्माण होतो, ज्यामुळे रोगांना आकर्षित करते. त्यामुळे व्यक्ती त्रस्त राहतो.  

घरामध्ये पलंगापासून ते स्वयंपाकघर आणि अभ्यासाच्या टेबलापर्यंत औषधे ठेवू नका. या ठिकाणी औषधे ठेवल्याने व्यक्तीच्या नशिबावर परिणाम होतो. त्यामुळे औषधांचा प्रभाव कमी होतो. हा आजार घरातील एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे पसरत राहतो. 

घरात 'या' ठिकाणी औषधे ठेवा 

घराच्या उत्तर-पूर्व दिशेला औषध ठेवणं नेहमीच शुभ असते. येथे प्रथमोपचार पेटी ठेवणे देखील वास्तुनुसार शुभ मानले जाते. यामुळे व्यक्ती नेहमी निरोगी राहतो. रोगांचा प्रभावही झपाट्याने वाढतो. आजारी व्यक्ती औषध घेत असेल तर तो लवकर बरा होतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com