

Vastu Tips: वास्तुशास्त्रात सुख-शांती राहण्यासाठी अनेक उपया सांगितलेले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का वास्तुशास्त्रात पोपट घरात पाळणे शुभ मानले जाते. पोपट माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जाते. तसेच हिरव्या रंगाचा पक्षी हा बुध ग्रहाचा मानक मानल जातो. बुध हा शुभ आणि सौम्य ग्रह मानला जातो. यामुळे आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच पोपट हा प्रेमसंबंधाचा देवता मानला जातो. त्यामुळे घरात पोपट ठेवल्याने घरातील सदस्यांमध्ये प्रेम आणि आपुलकी राहते.
पोपट एकटा ठेऊ नका
जर तुम्ही तुमच्या घरात पोपट ठेवण्याचा विचार करत असाल तर वास्तुनुसार पोपट एकटा ठेवू नका. घरात नेहमी पोपट आणि मैना यांची जोडी ठेवावी. यामुळे तुमच्या घरात पती-पत्नीमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि नात्यातील गोडवा वाढतो.
कोणत्या दिशेला ठेवावे
पोपट हा पक्षी सामान्य नसून धार्मिक पक्षी मानला जातो. त्यामुळे पोपट पाळायचा असेल तर पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे. ही दिशा संपत्तीची देवता भगवान कुबेर आणि धनाची देवी माता लक्ष्मी यांच्याशी संबंधित आहे. त्यामुळे या दिशेला पोपट ठेवल्याने माता लक्ष्मीची कायम कृपा तुमच्यावर राहते.
भाग्यावान मानले जाते
असे मानले जाते की पोपट हा एक निष्ठावान पक्षी आहे. तो पाळल्याने घरातील लोकांचे अकाली मृत्यूपासून संरक्षण होते. असे म्हणतात की पोपट तुमच्यावर येणाऱ्या समस्यांना दूर ठेवतो. ज्या घरात पोपट असतो त्या घरातील लोक भाग्यवान असतात आणि त्यांच्यावर देवाची कृपा राहते.
एकाग्रता वाढते
जर तुमच्या घरी मुलं शिकत असतील आणि त्यांना अभ्यासात रस नसेल तर तुम्ही पोपट पाळू शकता. पोपट पाळल्याने मुलांचे मन वेगाने काम करू लागते आणि त्यांची एकाग्रता वाढते. पोपट पाळल्याने मुलांची अभ्यासात रुची वाढते.
काय खायला द्यावे
पोपट पाळताना विशेष काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही पोपट पाळला तर त्याला खाण्यासाठी शक्य तितक्या हिरव्या गोष्टी द्याव्या. असे केल्याने तुमच्या घरात समृद्धी वाढते. घरात पोपट असेल तर त्याचे आनंदी राहणे खूप गरजेचे आहे हे लक्षात ठेवावे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.