Vastu Tips : घराच्या छतावर तुम्हीही 'या' गोष्टी ठेवत असाल तर वेळीच काढून टाका; नाहीतर होईल आर्थिक नुकसान

छतावर जमा होणाऱ्या रद्दीमुळे तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.
Vastu Tips For Money
Vastu Tips For Money Dainik Gomantak
Published on
Updated on

Vastu Tips : अनेकदा आपण घरात पडलेल्या निरुपयोगी आणि वापरात नसलेल्या वस्तू छतावर फेकतो. त्यामुळे छतावर मोठ्या प्रमाणात कचरा जमा होतो. पण तुम्हाला माहीत आहे का की छतावर जमा होणाऱ्या रद्दीमुळे तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो. या रद्दीमुळे माता लक्ष्मी क्रोधित होऊन घरात प्रवेश करत नाही.

(Vastu Tips For Money and Energy)

चुकूनही या गोष्टी छतावर ठेवू नका

  • वास्तू टिप्सनुसार घराची साफसफाई केल्यानंतर तिथून बाहेर पडणाऱ्या निरुपयोगी वस्तू लगेच फेकून द्याव्यात. छतावर कचरा गोळा करू नये. यामुळे घरात नकारात्मकता राहते आणि अशा घरात माता लक्ष्मीचा प्रवेश होत नाही.

  • निरुपयोगी झाडे, माती किंवा धूळ इत्यादी घराच्या छतावर जमा होऊ देऊ नका. वेळोवेळी छप्पर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून घाण तेथे दिसणार नाही.

  • घराच्या छतावर झाडू, गंजलेले लोखंड किंवा टाकाऊ लाकडाचे तुकडे ठेवणे टाळा. या सर्व गोष्टी छतावर ठेवणे अशुभ मानले जाते आणि यामुळे आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो.

  • बरेचदा लोक कपडे सुकवण्यासाठी छताला दोरी बांधतात, पण हे लक्षात ठेवा की दोरी बांधल्यानंतर कधीही छतावर दोरीचा बंडल ठेवू नका. वास्तूनुसार असे करणे अशुभ मानले जाते.

  • वृत्तपत्रे, मासिके घराघरात येतात आणि ती वाचून आपण गच्चीवर टाकतो. वास्तुशास्त्रानुसार, छतावरील जुन्या वर्तमानपत्रांचा ढीग लक्ष्मी आणि सरस्वती यांना क्रोधित करतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com