Vastu Tips: घरातील भितींवर सजावट करताना कोणती काळजी घ्यावी, वाचा वास्तुशास्त्र काय सागतं

घराची सजावट करताना अनेक लोक भिंतींच्या सजावटीकडे विशेष लक्ष देतात. पण भिंतींवर सजवट करतांना कोणती काळजी घ्यावी याबाबत वास्तुशास्त्रात काही नियम सांगितले आहेत.
Vastu Tips
Vastu TipsDainik Gomantak

vastu tips for home wall decor ideas read full story

सर्वांना आपलं घर सुंदर दिसावं असे वाटते. यासाठी सजावटीच्या अनेक गोष्टी वापरल्या जातात. अगदी भिंतीवर देखील सजावट केली जाते. सहसा, भिंतींच्या सजावटीदरम्यान, घराच्या अंतर्गत थीम लक्षात ठेवल्या जातात किंवा त्यास वैयक्तिक स्पर्श दिला जातो. पण अनेकदा आपण वास्तूच्या काही टिप्सकडे दुर्लक्ष करतो. भिंतीच्या सजावटीदरम्यान वास्तुच्या काही छोट्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर त्यामुळे भिंती आणि घर सुंदर तर होतेच पण घरात सकारात्मकताही येते.

लाकडी शोपीस

घरातील भिंतींवर लाकडी शोपीस लावण्याचा ट्रेंड वाढला आहे. आजकाल बाजारात अशा अनेक लाकडी शोपीस उपलब्ध आहेत, ज्या थेट भिंतीवर लावता येतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही भिंतीच्या सजावटीसाठी लाकडी मुखवटे इत्यादी वापरत असाल तर ते नेहमी पूर्व दिशेला भिंतीवर लावावे.

फुलांचे पोस्टर

अनेक लोकांना योग्य दिशा कळत नाही. त्यामुळे कोणत्याही दिशेला कोणत्याही वस्तु लावतात. वास्तुनुसार भिंत सजावताना पोस्टर किंवा फुलांची पेंटिंग लावावे. यामुळे घरात सकारात्मकता राहते.

पोस्टर लावावे

भिंतीवर सजावट करताना वॉल पोस्टर, वॉल पेंटिंग किंवा वॉलपेपर लावणे खूप चांगले मानले जाते. ते घराच्या कोणत्याही भिंतीवर लावता येते. पण जर तुम्हाला घरात आणि जीवनात सकारात्मकता आणि संपत्ती हवी असेल, तर तुम्ही उत्तर दिशेला एखाद्या मोठ्या समुद्र किंवा नदीचे पोस्टर ठेवावे.

उत्तर दिशेला पाण्याशी संबंधित मोठे पोस्टर लावूणे शुभ मानले जाते. यामुळे तुम्हाला कधीही पैशाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. दक्षिण दिशेला भिंतीवर लाल रंगाचे पोस्टर, कॅलेंडर किंवा फोटोही लावू शकता

मेटलची वस्तू

लाकडी शोपीस व्यतिरिक्त तुम्ही मेटलपासून बनवलेल्या कलाकृती किंवा सजावटीच्या वस्तू घरांमध्ये भिंतींवर लावू शकतात. जर तुम्ही अशी कोणतीही धातूची वस्तू तुमच्या भिंतीच्या सजावटीचा भाग बनवत असाल तर ती नेहमी पश्चिम दिशेला लावावे. भिंतीच्या सजावटीसाठी बंदुका किंवा तलवारी लावू नका. वास्तूनुसार असे करणे अशुभ मानले जाते.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com