Vastu Tips: वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यांना घरात ठेवल्याने वास्तुदोष दूर होतो. घरात साकारत्मक ऊर्जा राहते.
श्रीकृष्णाला गाय खुप प्रिय आहे. सर्व देवतांमध्ये गाय वास करतात. दूध, तुप,शेण आणि गोमुत्र यासारख्या गोष्टी गाईपासून मिळतात. वास्तुशास्त्रात गाईचा फोटो कुठे ठेवावा हे सांगितले आहे.
योग्य दिशा
पूर्व-दक्षिण दिशेला गाईचा पोटो ठेवल्याने संघर्ष, दु:ख, आर्थिक समस्या दूर करते. तसेच तुमच्या सर्व इच्छा पुर्ण करते.
गाईची सेवा करावी
वास्तुनुसार गाईची सेवा करणे शुभ मानले जाते. ज्या लोकांच्या घरात गाई-वासराची सेवा केली जातो त्या घरात कोणत्याही समस्या येत नाही.
मुलाखतीला जातांना
कोणत्याही मुलाखतीला जाताना गाईला हिरवा चारा खाऊ घालावा. वास्तुशास्त्रानुसार असे करणे शुभ मानले जाते. यामुळे सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते.
संतती प्राप्ती
वास्तूशास्त्रानुसार वासराला दूध पाजणारी गाय घरात ठेवल्याने संतती होण्याची शक्यता निर्माण होते. जोडप्याने गाईचा असा फोटो आपल्या बेडरूममध्ये अशा प्रकारे ठेवावे की त्यांची नजर पुन्हा पुन्हा त्यावर पडेल.
यश आणि समृद्धी
वास्तूनुसार आपल्या घरी आणि कामाच्या ठिकाणी नाण्यांच्या ढिगाऱ्यावर गाय बसवणे खूप शुभ मानले जाते. यामुळे यश आणि समृद्धी लाभते.
घरी किंवा ऑफिसमध्ये ठेवणे शुभ
गाईची मूर्ती घरी किंवा ऑफिसमध्ये ठेवणे शुभ मानले जाते. कारण यामुळे व्यक्तीच्या विचारांमध्ये सकारात्मक बदल होतात. व्यक्ती योग्य निर्णय घेण्यास सक्षम बनतात. आर्थिक लाभ होऊ शकतो.
करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी
वास्तुशास्त्रानुसार करिअरमध्ये यश मिळवण्यासाठी आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घराच्या उत्तर दिशेला राधा-कृष्णाच्या मागे बांधलेली गाय असा फोटो लावावे.
गाईची पुजा करणे
जो कोणी गायीची पूजा करतो त्याला कोणत्याही समस्यांना तोंड द्यावे लागत नाही. तसेच नकारात्मक ऊर्जा तुमच्यापासून दूर राहते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.