Plants Vastu Tips: उत्तर दिशेला 'हे' रोप ठेवल्यास माता लक्ष्मी होईल प्रसन्न

Plants Vastu Tips: जर उत्तरेकडे मोकळी जागा असेल तर वास्तुनुसार तुम्ही कोणती रोप लावु शकता हे जाणून घेऊया.
Vastu Tips For Plants
Vastu Tips For PlantsDainik Gomantak
Published on
Updated on

Plants Vastu Tips: वास्तुशास्त्रात अनेक गोष्टींसाठी वास्तु टिप्स सांगितल्या आहेत. घराची उत्तर दिशा ही कुबेर देवताची दिशा म्हणून ओळखली जाते.

या दिशेला आकर्षित करणारी रोप लावणे शुभ मानले जाते. जर उत्तरेकडे मोकळी जागा असेल तर वास्तुनुसार तुम्ही कोणती रोप लावु शकता हे जाणून घेऊया.

 Money plant
Money plantDainik Gomantak

घरात मनी प्लांट लावणे शुभ मानले जाते. यामुळे घरातील आर्थिक समस्या कमी होतात. हे रोप उत्तर दिशेला लावल्यास घरात सुख-समृद्धी लाभते.

Banana Plant
Banana Plant Dainik Gomantak

केळीचे रोप घराच्या उत्तर दिशेला लावल्यास वास्तुनुसार शुभ मानले जाते. केळीचे रोप लावल्यावर रोज पुजा करावी. असे केल्याने भगवान विष्णूची कृपा दृष्टी कायम राहते.

घरामध्ये कधीही आर्थिक समस्या निर्माण होणार नाही. माता लक्ष्मी देखील प्रसन्न होते.

Bambu
Bambu Dainik Gomantak

वास्तुनुसार बांबुचे रोप उत्तर दिशेला लावणे शुभ मानले जात. या रोपाला वास्तुमध्ये सौभाग्यच मानले जाते.

जर तुमच्या घरात उत्तर दिशेला बाल्कनी असेल तर हे रोप काचेच्या भाड्यात ठेवावे.

Tulsi
Tulsi Dainik Gomantak

तुळशीला वास्तुशास्त्रात खुप महत्व आहे. प्रत्येक घरामध्ये तुळशीचे रोप असते.

त्याची रोज पुजा देखील केली जाते. हे रोप उत्तर दिशेला लावणे शुभ मानले जाते. ही वनस्पती वाढण्यासाठी पुरेसा सुर्यप्रकाश गरजेचा असतो.

Orange
Orange Dainik Gomantak

वास्तुशास्त्रात संत्रा रोपाला खूप महत्व आहे. असे मानले जाते की हे रोप लावल्याने तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती दूर होते.

हे रोप उत्तर दिशेला लावल्यास घरात सुख-समृद्धी लाभते. कुटूंबातील सर्व सदस्यांमध्ये आपुलकी वाढते. जर तुमच्या घराचे प्रवेशद्वार उत्तर दिशेला असेल तर हे रोप ठेऊ शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com