Vastu Tips For Aloe Vera Plant: कोरफड आरोग्यासह त्वचेच्या समस्यांवर देखील फायदेशीर आहे. वास्तुशास्त्रानुसार कोरफडमध्ये अनेक औषधीयुक्त गुणधर्म असतात. वास्तुशास्त्रात या झाडाला विशेष महत्व आहे. कोरफडमुळे मानवाच्या अनेक समस्या दूर होतात. चला तर मग जाणून घेऊया कोरफड संबंधित असलेले काही सोपे उपाय, ज्यामुळे तुमचे आयुष्यच बदलून जाईल.
सुख-समृद्धीसाठी
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये कोरफडचे रोप लावणे खूप शुभ मानले जाते. घरी लावल्याने घरात सुख-समृद्धी लाभते. कोरफड नेहमी पश्चिम दिशेला लावणे उत्तम मानले जाते. असे केल्याने जीवनातील प्रगतीचा मार्ग खुला होतो.
लव्ह लाईफ
जर एखाद्याच्या लव्ह लाईफमध्ये समस्या येत असतील तर त्या व्यक्तीने घराच्या पूर्व दिशेला कोरफडचे रोप लावावे. असे केल्यास व्यक्तीच्या आयुष्यात प्रेम वाढते.
आर्थिक समस्या
जर एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात आर्थिक समस्या असतील तर त्यांने आपल्या घराच्या बागेत किंवा बाल्कनीमध्ये कोरफडचे रोप लावावे. कोरफड घरामध्ये लावू नये. कारण घरामध्ये लावल्याने नकारात्मकता वाढते आणि मन विचलित होत राहते.
योग्य दिशेला लावावे
कोरफडचे रोप योग्य दिशेने लावल्यास अनेक फायदे मिळतात. पण वास्तुनुसार कोरफड उत्तर किंवा दक्षिण दिशेला लावू नये. कारण वास्तुनुसार अशुभ परिमाण मिळू शकतात.
करिअरसाठी फायदेशीर
तुम्हाला जर करिअरमध्ये यश मिळवायचे असेल तर घराच्या बाल्कनीमध्ये पश्चिम दिशेला कोरफडचे रोप लावावे.
सकारात्मक ऊर्जा
घरात सकारात्मक आणि हसते वातावरण हवे असेल तर तुम्ही घरात कोरफडचे रोप लावू शकता. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघुण जाते.
(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.