Vastu Tips: आपण सर्वजण आपल्या स्टाईलने कपडे घालतो. एवढेच नाही तर वेगवेगळ्या वेळी किंवा प्रसंगा दरम्यान आपण वेगवेगळे कपडे घालत असतो. कपड्यांमुळे तुम्हाला एक वेगळी ओळख मिळते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या कपड्यांच्या स्टाइलवर विशेष लक्ष देणे गरजेचे असते. पण तुम्हाला माहित आहे का की कपडे परिधान करताना वास्तूच्या काही छोट्या टिप्सकडेही लक्ष दिले पाहिजे. जेणेकरून तो तुमच्यासाठी नकारात्मकता निर्माण करणार नाही.
रात्री रेशिम कपडे घालु नका
साधारणपणे आपण वेगवेगळ्या वेळी वेगवेगळे कपडे घालतो. रात्री झोपतांना रेशमी कपडे न घालता सुती कपडे घालावे. यामुळे तुम्हाला चांगली झोप लागते. कारण हे कपडे तुमच्या शरीराची ऊर्जी टिकवुन ठेवते. रेशमी कपड्यांचा तुमच्या शरीरातील ऊर्जेवर नकारात्मक परिणाम होतो.
रिप्ड कपडे
आजकाल फाटलेल्या कपड्यांचा म्हणजे रिप्ड कपड्यांचा ट्रेंड खूप वाढला आहे. लोकांना फॅशनेबल दिसण्यासाठी असे कपडे घालायला आवडते. पण वास्तूनुसार असे रिप्ड कपडे घालणे चांगले मानले जात नाही. असे कपडे परिधान केल्याने गरिबीची शक्यता वाढते. त्यामुळे हे कपडे शक्यतो घालणे टाळावे.
अस्वच्छ कपडे
नेहमी स्वच्छ कपडे घालावे. अस्वच्छ कपडे घातल्यास तुमच्यामध्ये नकारात्मता वाढते. यामुळे तुम्हाला कोणत्याही कामात उत्साह वाटत नाही.
कोणाच्या सांगण्यावरून कपडे घालू नका
कपडे घालताना आपण नेहमी आपल्या आवडीनुसार घालावे. अनेकवेळा असे घडते की आपल्याला वेगळ्या प्रकारचे कपडे घालायचे असतात, परंतु इतरांच्या सांगण्यावरून आपण काहीतरी वेगळे घालतो. उदाहरणार्थ, जर तुम्हाला लाल रंगाचे कपडे घालायचे असतील , परंतु दुसऱ्याच्या सल्ल्याने तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे घालता. असे करू नका.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.