Diwali 2023: दिवाळीत घरी आणा 'हे' 5 फोटो, माता लक्ष्मी होईल प्रसन्न

वास्तुनुसार तुम्ही दिवाळीत पुढिल फोटो घरात आणु शकता.
Diwali 2023
Diwali 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Diwali 2023: दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. यंदा १२ नोव्हेंबरला दिवाळी साजरी केली जाणार आहे. या दिवशी गणेश आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने सुख, समृद्धी, संपत्ती, कीर्ती आणि वैभव प्राप्त होते. 

दिवाळीपूर्वी आपण घराची साफसफाई करतो आणि घरात नवीन वस्तू आणतो. दिवाळीची खरेदी करत असाल तर हे पाच फोटो घरात नक्की आणावे. वास्तूनुसार हे फोटो घरामध्ये लावल्याने जीवनात सुख-समृद्धी येते आणि माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. हे फोटो संपत्ती आणि आदर आकर्षित करतात आणि जीवनात सकारात्मकता टिकवून ठेवतात. चला तर मग जाणून घेऊया हे फोटो कोणते आहेत.

पोपट

वास्तुशास्त्रानुसार दिवाळीला तुमच्या घरात पोपटाचा फोटो नक्कीच आणावा. पोपट बुध आणि शुक्र ग्रहांचे प्रतिनिधित्व करतो, जे जीवनात आनंद, समृद्धी आणि सकारात्मकता आणते. मुलांच्या खोलीत पोपटाचा फोटो लावल्याने त्यांची एकाग्रता वाढते आणि अभ्यासातही मदत होते. तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये हिरव्या पोपटाचा फोटो लावू शकता.


सात घोड्यांचा फोटो

वास्तूनुसार दिवाळीला सात घोड्यांचा फोटो लावल्याने सौभाग्य वाढते आणि माता लक्ष्मीचा आशीर्वादही मिळतो. हा फोटो घरात लावल्याने तुमच्या अपूर्ण कामाला गती मिळते आणि तुमचे काम लवकर पूर्ण होते. सात धावणारे घोडे प्रगती, धैर्य आणि यशाचे प्रतीक आहेत. दिवाळीपूर्वी हा फोटो घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर किंवा अशा ठिकाणी लावा की, ये-जा करताना सर्व सदस्यांची नजर त्यावर पडेल.

माता लक्ष्माचा फोटो

दिवाळीला सर्वजण माता लक्ष्मीची मूर्ती बसवतात. पण दिवाळीच गणेश, माता लक्ष्मी आणि कुबेर यांचा एकत्र असलेला फोटो आणावा. असे केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि कधीही पैशाची कमतरता भासत नाही. दिवाळीच्या संध्याकाळी या फोटोचे पूजन केल्याने माता लक्ष्मीसह भगवान कुबेर यांचा आशीर्वाद प्राप्त होतो.

घुबड

दिवाळीत खरेदीला जाताना घुबडाचा फोटो नक्की खरेदी करावा. घुबडाला माता लक्ष्मीचे वाहन मानले जाते आणि ते जीवनात सुख आणि समृद्धी आणते. घरात घुबडाचा फोटो लावल्याने सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहतो आणि वाईट नजर घरापासून दूर राहते. कामाच्या ठिकाणी घुबडाचा फोटो ठेवल्याने करिअरमध्ये प्रगती होते आणि अनेक सुवर्ण संधी मिळतात.

धबधब्याचा फोटो

यंदा दिवाळीत तुम्ही वाहत्या धबधब्याचा फोटो घरात आणून ड्रॉईंग रूममध्ये लावु शकता. वाहणाऱ्या पाण्याचा झरा घरात गतिमानता आणतो. कारण पाण्याचे स्वरूप प्रवाही राहणे आणि गतिमान राहणे आहे. याशिवाय जलऊर्जेचा सकारात्मक प्रभाव घरावर राहतो आणि घरातील सदस्यांचे मनही शांत रोहते. याशिवाय हा फोटो घरात सुख-शांती टिकवून ठेवते आणि व्यक्तिमत्त्वही वाढवते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com