Vastu Tips: घरात बैलाची मूर्ती ठेवणे शुभ की अशुभ? वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं

वास्तुशास्त्रानुसार घरात बैलाची मुर्ती ठेवणे शुभ की अशुभ मानले जाते हे जाणून घेऊया.
Vastu Tips
Vastu TipsDainik Gomatak
Published on
Updated on

Vastu Tips: तुमच्यापैकी अनेकलोक घरात कोणत्या ना कोणत्या मूर्ती ठेवत असतील. देवाच्या मूर्तीशिवाय घराच्या सजावटीसाठी किंवा आपल्या छंदासाठी मूर्ती ठेवण्याचा ट्रेंड झाला आहे. काही लोक फेंगशुई किंवा धार्मिक चिन्हांच्या मूर्ती ठेवतात तर काही लोकांना प्राणी आणि पक्ष्यांच्या मूर्ती घरात ठेवायला आवडतात, परंतु वास्तूमध्ये असे म्हटले आहे की प्रत्येक मूर्ती सारखी नसते किंवा ती समान परिणाम देत नाही. 

वास्तुशास्त्रानुसार, प्रत्येक मूर्तीचे स्वतःचे महत्त्व असते आणि तिचा स्वतःचा प्रभाव देखील असतो. जो घर आणि घरातील सदस्यांवर दिसून येतो. अशीच एक मूर्ती बैलाची आहे. बैलाची किंवा त्याच्या शिंगांची मूर्ती घरी ठेवणारे बरेच लोक आहेत. कारण बैल हा शक्ती दर्शवतो पण खरच बैलाची मूर्ती घरात ठेवावी का?

हिंदू धर्मात बैलाला नंदीचे रूप मानले जाते. बैलाची मूर्ती ठेवायची असेल तर बैलाऐवजी नंदीजींची मूर्ती आणू शकता. नंदीची मूर्ती घरात ठेवणे शुभ मानले जाते. वास्तुशास्त्रात देखील नंदीची मूर्ती ठेवण्याचा उल्लेख आहे. 

घरात बैलाची मूर्ती ठेवू नये. बैलाची मूर्ती ठेवल्याने घरात नकारात्मकता येते. कारण बैल शक्तीचे प्रतिनिधित्व करतो तर नंदीची मूर्ती भगवान शिवची भक्ती आणि कृपा दर्शवते. बैलाची मूर्ती घरात ठेवल्याने कर्ज वाढते. 

घरावर किंवा कुटुंबातील सदस्यांवरही एक प्रकारचा भार राहतो. तसेच बैल हे आक्रमकतेचे प्रतीक मानले जाते. घरात बैलाची मूर्ती ठेवल्याने घरातील सदस्यांच्या स्वभावात राग निर्माण होऊन घरात अशांतता निर्माण होते. 

नंदीची मूर्ती ठेवली तर लक्षात ठेवा ती साधारण बैल मूर्ती नसून शिवभक्त नंदी आहे. यामुळे रोज त्याची पूजा करून नंदीच्या प्रतिमेसमोर उभे राहून भगवान शंकराचे ध्यान करून त्यांच्या मंत्रांचा जप करावा. 

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com