Door Vastu Tips for Home: दरवाजाशी संबंधित फॉलो करा 'या' वास्तु टिप्स, घरात राहिल सुख-शांती

Vastu Tips for Home: घरात सुख-समृद्धी आणण्यासाठी वास्तुत सांगितलेले नियम फॉलो केले पाहिजे.
Door Vastu Tips for Home
Door Vastu Tips for HomeDainik Gomantak
Published on
Updated on

vastu tips and rules related with doors know vastushtra forgood luck

बदलत्या काळानुसार अनेक गोष्टी बदलल्या आहेत. जसे की घराचा दरवाजा, आजकाल आधुनिक दरवाजे बसवण्याचा ट्रेंड आहे. लोक त्यांच्या घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी स्टायलिश दरवाजे बसवतात. पण तुम्हाला माहित आहे का की प्रत्येक सुंदर दिसणाऱ्या दरवाजाचा तुमच्या आयुष्यावर चांगला प्रभाव पडतोच असे नाही.

यासाठी वास्तूत सांगितलेले काही नियम लक्षात घेऊन घरामध्ये दरवाजे बसवावेत. घरातील दरवाज्यांकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. कारण घराच्या दारातूनच घरामध्ये सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा येते. या ऊर्जांचा तुमच्या जीवनावरही मोठा प्रभाव पडतो. चला तर जाणून घेऊया घराच्या दरवाजाशी संबंधित वास्तु नियम कोणते आहेत.

दुहेरी दरवाजा

आजकाल घरांमध्ये एकच दरवाजे बसवले जातात. परंतु जुन्या काळात घरांमध्ये दुहेरी पल्ल्याचे दरवाजे बसवले जात होते. दोन पानांचे दरवाजे शुभ मानले जातात. कारण वास्तूनुसार घरातील सदस्यांमध्ये चांगले संबंध राखणे आवश्यक आहे. यामुळे घरातील तणाव दूर होतो.

बाहेर उघडणारा दरवाजा

अनेक लोक आपल्या घरात बाहेरच्या बाजून उघडणारा दरवाजा बसवतात, पण अशा दरवाजामुळे अनेक प्रकारचे वास्तुदोष होऊ शकतात. यामुळे तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि तुमची प्रगती होत नाही. त्यामुळे प्रत्येक घरात सुख आणि समृद्धी राहण्यासाठी घरामध्ये एक दरवाजा बसवा जो आतल्या बाजूने उघडेल.

टुटलेला दरवाजा

घरात बसवलेल्या लोखंडी दरवाज्यांमधून अनेकदा आवाज येऊ लागतो किंवा काही ठिकाणी लाकडी दरवाजांनाही तडे जाऊ लागतात. असे दरवाजे घरामध्ये वास्तु दोष निर्माण करू शकतात. घराच्या दारात आवाज नसावा किंवा दरवाजा तुटू नये.

मुख्य दरवाजा छोटा असणे

तुमच्या घरात वेगवेगळे दरवाजे आहेत पण घराचा मुख्य दरवाजा मोठा असावा. म्हणजे घरातील बाकीचे दरवाजे छोटे असू शकतात पण घराचे मुख्य दरवाजा लहान नसावा. घराचा मुख्य दरवाजा घराच्या इतर दारांपेक्षा मोठा असावा.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com