Vastu Shashtra: कोणत्या दिवशी झाडू घेऊ नये विकत, वाचा वास्तुशास्त्र काय सांगत

वास्तुशास्त्रानूसार झाडूमध्ये माता लक्ष्मी वास करते, त्यामुळे तिचा वापर करण्यापूर्वी झाडूशी संबंधित नियम जाणून घेणे गरजेचे आहे.
Vastu Shashtra:
Vastu Shashtra:Dainik Gomantak
Published on
Updated on

वास्तुशास्त्रानूसार झाडूमध्ये माता लक्ष्मी वास करते, त्यामुळे तिचा वापर करण्यापूर्वी झाडूशी संबंधित नियम जाणून घेणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्रात झाडू घरी आणण्याशी संबंधित गोष्टी सांगितल्या आहेत.

दैनंदिन जीवनात व्यक्ती वापरत असलेल्या अनेक गोष्टी आहेत. यामध्ये झाडू एक वस्तु आहे ज्याचा रोज वापर केला जातो. झाडूचा वापर स्वच्छतेसाठी केला जातो. ज्योतिष आणि वास्तुशास्त्रामध्ये झाडूला महत्त्व दिले गेले आहे. परंतु धार्मिक दृष्टीनेही झाडू विशेष मानली जाते. झाडू देवी लक्ष्मीशी संबंधित आहे.

झाडूमध्ये माता लक्ष्मी वास करते असे मानले जाते. त्यामुळे तिचा वापर करण्यापूर्वी झाडूशी संबंधित नियम जाणून घेणे आवश्यक आहे. वास्तुशास्त्रात झाडू खरेदी करणे किंवा घरी आणण्याशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या आहेत.

या दिवशी चुकूनही झाडू खरेदी केला तर त्याला अशुभ परिणाम भोगावे लागू शकतात, म्हणून आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत की कोणत्या दिवशी झाडू खरेदी करणे अशुभ आहे.

Vastu Shashtra:
Cornflakes Side Effects: कॉर्नफ्लेक्स आरोग्यासाठी ठरु शकते धोकादायक, संशोधनात धक्कादायक खुलासा

वास्तुशास्त्र आणि धार्मिक मान्यतेनुसार सोमवारच्या दिवशी झाडू कधीही विकत घेऊ नये कारण आठवड्याचा पहिला दिवस म्हणजे सोमवार हा शिवपूजेसाठी समर्पित आहे, आणि या दिवशी नवीन झाडू वापरणे देखील चांगले मानले जात नाही. त्यामुळे घरात दारिद्र्य राहते. शुक्ल पक्षात झाडू कधीही खरेदी करू नये, यामुळे व्यक्तीला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो.

  • कोणत्या दिवशी झाडू खरेदी करु नये

शुक्ल पक्षात झाडू खरेदी करणे अशुभ मानले जाते. तसेच रविवार धार्मिकदृष्ट्या सूर्यदेवाला समर्पित असतो, त्यामुळे या दिवशी नवीन झाडू खरेदी करून घरी आणल्यास कुटुंबाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्याचप्रमाणे शनिवारी घरात झाडल्याने धनहानी होते, त्याचप्रमाणे शनिदोषही जाणवतो.यामुळे झाडू खरेदी करतांना काळजी घ्यावी.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com