Vastu Tips For Valentine's Gift: 'व्हॅलेंटाइन डे' ला जोडीदाराला चुकूनही देऊ नका 'हे' गिफ्ट, नात्यात येऊ शकते कटूता

Vastu Tips For Valentine's Gift: वास्तुनुसार 'व्हॅलेंटाइन डेनिमित्त जोडीदाराला कोणते गिफ्ट देऊ नये हे जाणून घेऊया.
Vastu Tips For Valentine's Gift
Vastu Tips For Valentine's GiftDainik Gomantak

do not gift these things partner on valentine day according vastushtra

कपल्ससाठी 14 फेब्रुवारी हा दिवस खूप खास असतो. कारण दरवर्षी या दिवशी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी कपल्स वेगवेगळ्या प्रकारे आपले प्रेम व्यक्त करतात आणि हा दिवस स्पेशल बनवण्यासाठी जोडीदारांना गिफ्ट देतात. परंतु गिफ्ट देताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्रानुसार काही गिफ्ट अशा असतात ज्यामुळे नात्यात दुरावा आणू शकतात.

शूज

जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे आवडते शूज गिफ्ट करायचे असतील तर तसे करू नका. वास्तुनुसार शूज नकारात्मक ऊर्जा पसरवते. यामुळे तुमचे नात्यात दुरावा येऊ शकतो.

काळे कपडे

व्हॅलेंटाइन डेला चुकूनही काळे कपडे जोडीदाराला गिफ्ट करू नका. वास्तुनुसार हा रंग अशुभ मानला जातो. यामुळे तुमच्या नात्या कटूता येऊ शकते.

ताजमहाल

ताजमहाल हे प्रेमाचे प्रतिक मानले जाते. पण ताजमहालचा शो पीस देणे अशुभ मानले जाते. कारण ताजमहाल ही मुमताजची कबर आहे आणि वास्तुशास्त्रात कबरीसारख्या गोष्टी नात्यात नकारात्मकता आणू शकतात.

रुमाल

वास्तुशास्त्रानुसार मित्राला किंवा जोडीदाराला रुमाल गिफ्ट दिल्याने नात्यात कटुता येते. यामुळे कधीही रूमाल गिफ्ट करू नका.

परफ्यूम

व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी तुमच्या पार्टनरला परफ्यूम गिफ्ट करू नका. वास्तुनुसार असे केल्याने नात्यात दुरावा निर्माण होतो आणि गैरसमज वाढू लागतात.

(Disclaimer - या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com