Valentine's Day Celebration: व्हॅलेंटाईन डे अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. हा दिवस दरवर्षी 14 फ्रेब्रुवारीला साजरा केला जतो. जर तुम्ही यंदा एकमेकांच्या जवळ नसाल तर तुम्ही पुढील खास पद्धतीने हा दिवस स्पेशल बनवू शकता.
मेमरीज् तयार करा
तुम्ही जगात कुठेही असलात तरीही एकत्र आठवणी तयार करू शकता. त्या कोणत्याही गिफ्टशिवाय अधिक मौल्यवान आहेत आणि एकमेकांच्या जवळ जाण्याचा सर्वोत्तम मार्ग आहेत.
व्हर्च्युअल डेट
व्हॅलेंटाईन डेनिमित्त तुम्ही आभासी तारखेची योजना करू शकता. तुम्ही तुमचे घर थोडे सजवू शकता आणि तुमच्या पार्टनरला व्हिडिओ कॉल करू शकता. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत व्हर्च्युअल कँडल लाईट डिनर देखील घेऊ शकता.
टेकअवे
या खास दिवशी तुम्ही एकमेकांच्या आवडीचे पदार्थ ऑर्डर करू शकता. एकमेकांच्या आवडत्या डिशची ऑर्डर देऊन तुम्ही हा दिवस अधिक रोमँटिक बनवू शकता. तुम्ही एकमेकांच्या जवल नसले तरी भावनिकरित्या जवळ असल्याचाअनुभव येईल.
हृदयीस्पर्शी मॅसेज पाठवणे
व्हॅलेंटाइन डेला तुम्ही तुमच्या जोडीदाराला हृदयीस्पर्शी मॅसेज पाठवू शकता. त्यात तुम्ही तुमच्या भावना लिहा आणि तुम्हाला त्यांच्याबद्दल काय वाटत आहे तेही लिहू शकता.
मुव्ही पाहू शकता
व्हॅलेंटाईन डेनिमित्त तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत एक रोमँटिक चित्रपट ऑनलाइन पाहू शकता. यामुळे हा दिवस खास पद्धतीने साजरा करू शकता.
गेम खेळा
व्हॅलेंटाईन डेला तुम्ही ऑनलाइन छोटे छोटे गेम्स खेळू शकतात. हा एक उत्तम पर्याय आहे. यामुळे तुम्ही दोघे एकत्र क्वॉलिटी टाइम घालवू शकता.
गिफ्ट
लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये असताना तुम्ही जोडीदाराल व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी त्यांची आवडती वस्तु गिफ्ट म्हणून धेऊ शकता. ती वस्तु तुम्ही ऑनलाइन ऑर्डर करू शकता किंवा मित्राद्वारे पाठवून तुमच्या जोडीदाराला एक सुंदर व्हॅलेंटाइन सरप्राईज देऊ शकता.
रोमॅटिंक व्हिडिओ तयार करणे
तुम्ही व्हॅलेंटाइन डे जोडीदारासाठी खास बनवण्यासाठी रोमॅंटिक व्हिडिओ तयार करू शकता. या व्हिडिओमध्ये तुम्ही दोघांचे फोटो एकत्र करून टाकू शकता. या फोटोमध्ये रोमॅटिंक गाणं देखील प्ले करू शकता. हे देखील एक खास गिफ्ट असू शकते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.