Valentine's Day Trip: व्हॅलेंटाईन डेनिमित्त ट्रिपला जाण्याचा विचार करताय? मग फॉलो करा 'या' टिप्स

Valentine's Day Trip: जर तुम्हीही व्हॅलेंटाईन डेच्यानिमित्ताने जोडीदारासोबत ट्रिप प्लॅन करत असाल तर पुढील गोष्टी लक्षात ठेऊ शकता.
Valentine's Day Trip
Valentine's Day TripDainik Gomantak
Published on
Updated on

valentines day 2024 planning romantic trip then follow these tips

फेब्रुवारी हा असा महिना आहे ज्याची लव्हबर्ड आतुरतेने वाट पाहत असतात. कारण व्हॅलेंटाईन वीक 7 फ्रेब्रुवारीपासून सुरू होतो. व्हॅलेंटाईन वीक एक असा काळ असतो जेव्हा जोडपे एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करतात. एकमेकांना जवळून जाणून घेण्यासाठी आणि प्रेम करण्यासाठी हा काळ सर्वोत्तम मानला जातो.

व्हॅलेंटाईन डे आठवड्याच्या विशेष प्रसंगी, अनेक जोडपी एकत्र क्कॉलिटी टाइम घालवण्यासाठी ट्रिप प्लॅन करतात. जर तुम्ही व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ट्रिप प्लॅन करत असाल तर, प्रवास संस्मरणीय आणि सुंदर बनवण्यासाठी तुम्ही पुढील ट्रॅव्हल टिप्स फॉलो करू शकता.

तिकिट बुक करणे

ट्रिपला जाण्यापुर्वी काही दिवस आधी तिकीट बुक करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी जाणाऱ्या आणि येणाऱ्या दोन्ही बाजूंचे तिकीट बुक करा. ज्या दिवशी जायचे आहे त्याच दिवशी तिकीट बुक कराल असे नाही. काही दिवस आधीच तिकीट बुक करावे.

सुरक्षितता लक्षात घ्यावी

कोणत्याही ट्रिपला जाण्यापूर्वी सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. खास करून जेव्हा जोडपे त्यांच्या शहरापासून दूर डोंगर, वाळवंट किंवा समुद्राच्या किनाऱ्यावर एकत्र जात असतील, तेव्हा सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

सुरक्षिततेची हमी नसलेल्या ठिकाणी कधीही ट्रीपचे प्लॅन करू नका. याशिवाय जिथे सुविधांचा अभाव आहे अशा ठिकाणी कधीही ट्रिप प्लॅन करू नका. डोंगरात अनेक गोष्टी सहजासहजी मिळत नाहीत. अनेक वेळा पोलिस चौकीही जवळपास नसते.

रोमँटिक ठिकाण

व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी रोमँटिक ठिकाण निवडावे. अनेक वेळा हॉटेलच्या ठिकाणामुळे जोडप्यांमधील प्रेम चार पटीने वाढते. जर तुम्ही व्हॅलेंटाईन डे पर्वतांमध्ये साजरा करणार असाल तर तुमची रूम अशा ठिकाणी बुक करा जिथून तुम्हाला पर्वतांचे सुंदर आणि विलोभनीय दृश्य पाहता येईल. समोरचे डोंगर आणि डोंगरावर उठणारे ढग प्रेमाच्या सौंदर्यात भर घालू शकतात. पर्वतांव्यतिरिक्त, समुद्राच्या किनाऱ्याजवळ रूम बुक करून तुम्ही व्हॅलेंटाईन डे देखील साजरा करू शकता.

इतर गोष्टीही ठेवा लक्षात

तुमच्या जोडीदारासोबत व्हॅलेंटाईन ट्रिपला जाण्यापूर्वी तुम्हाला इतर अनेक टिप्स फॉलो कराव्या लागतील.

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये खूप थंड असते, त्यामुळे हवामानानुसार बॅग पॅक करावी.

ट्रिपला जाण्यापूर्वी काही आवश्यक औषधे जसे की सर्दी, ताप, डोकेदुखी, उलट्या इत्यादींसाठी औषधे सोबत ठेवावी.

प्रवास संस्मरणीय आणि सुंदर बनवण्यासाठी तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी काही गिफ्ट देखील पॅक करू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com