व्हॅलेंटाईन वीक 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी दरम्यान साजरा होणार आहे. व्हॅलेंटाईन वीकमध्ये प्रेमी एकमेकांबद्दलचे प्रेम व्यक्त करतात आणि एकत्र वेळ घालवतात. आता व्हॅलेंटाईन वीक येणार आहे, जर तुम्हाला व्हॅलेंटाईन वीकमध्ये सुंदर आणि वेगळे दिसायचे असेल, तर आतापासून या स्किन केअर रूटीन फॉलो करायला सुरूवात करा.
मृत पेशी काढून टाका
त्वचा सुंदर आणि ग्लोइंग करण्यासाठी त्वचेच्या मृत पेशी काढून टाकणे गरजेचे आहे. यासाठी त्वचा एक्सफोलिएट करावी. घरच्या घरी स्किन एक्सफोलिएशनसाठी कोरफड जेल, कॉफी, लिंबाचा रस, साखर आणि मध मिक्स करून चेहऱ्यावर मसाज करावी. नतंर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवावा.
क्विक शीट मास्क
चेहऱ्याच्या स्वच्छतेसाठी क्विक शीट मास्क वापरू शकता. क्विक शीट मास्क लावल्याने चेहऱ्यावर ताजेपणा आणि चमक कायम राहते. तुम्ही आठवड्यातून एकदा किंवा दोनदा हे करू शकता. तुम्ही त्वचेच्या प्रकारा नुसार शीट मास्क वापरू शकता.
आहाराची काळजी घ्या
त्वचेची काळजी घेण्यासाठी आहाराचीही काळजी घेणे गरजेचे आहे. त्वचेचे पोषण बाहेरून तसेच आतूनही झाले पाहिजे. त्वचेला संपूर्ण पोषण मिळण्यासाठी आहारात व्हिटॅमिन सी समृद्ध असलेल्या गोष्टींचा समावेश करा. संतुलित आहार घ्यावा. तळलेले आणि फास्ट फूड खाणे टाळावे.
शरीराला हायड्रेट ठेवा
ग्लोइंग स्किनसाठी शरीर हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे. चेहऱ्याची चमक टिकवून ठेवण्यासाठी, शक्य तितके पाणी प्या आणि त्वचेला हायड्रेट ठेवा. त्वचेला हायड्रेट करण्यासाठी तुम्ही बॉडी लोशन देखील वापरू शकता.
तणावापासून दूर राहा
तणाव आणि थकव्यामुळे चेहरा निस्तेज दिसू शकतो. यामुळे डोळ्यांभोवती काळी वर्तुळे देखील होऊ शकतात. डोळ्यांखालील काळी वर्तुळे सौंदर्य कमी करतात. अशावेळी तणावापासून दूर राहण्यासाठी पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.