Valentine Day 2024: 'व्हॅलेंटाईन डे' च्या आधी स्लिम अन् ट्रिम दिसायचे असेल तर फक्त करा 'हे' काम

जर तुम्हाला व्हॅलेंटाइन डेच्या आधी वजन कमी करायचे असेल तर पुढील डाएट प्लॅन फॉलो करू शकता.
Valentine Day 2024:
Valentine Day 2024: Dainik Gomantak
Published on
Updated on

Valentine week 2024 weight loss before valentine day special diet plan

प्रत्येक जोडपे व्हॅलेंटाईन डेची आतुरतेने वाट पाहत असतात. या दिवशी, जोडपे पार्टी, डिनर डेट्स आणि ट्रिपचे प्लॅनिंग करतात. 14 फेब्रुवारी हा विशेष दिवस असल्याने ही भावनाही विशेष आहे. या दिवशी सुंदर आणि चांगले दिसणे देखील महत्त्वाचे आहे. फिट बॉडी आणि चमकणारी त्वचा तुमची मजा अधिक वाढवू शकते.

अशावेळी जर तुमचे वजन वाढले असेल आणि तुम्हाला व्हॅलेंटाइन डेच्या आधी एक परफेक्ट फिगर मिळवायची असेल, तर तुम्ही 7 दिवसांचा खास डाएट प्लॅन फॉलो करू शकता. 7 दिवस काय करावे लागेल हे जाणून घेऊया

आहारतज्ञ सांगतात की सकाळची सुरुवात डिटॉक्स ड्रिंकने करणे फायदेशीर ठरू शकते. जिरे किंवा मेथी पाण्यात लिंबू मिसळून प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते. हे शरीरासाठी देखील फायदेशीर आहे.

जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्ही सकाळी नाश्ता केला पाहिजे. यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि भूक नियंत्रित ठेवण्यासही मदत होते. तज्ज्ञांच्या मते, ओट्स, फ्रेश फ्रूट स्मूदी, दलिया यांसारखे उच्च फायबर आणि कमी चरबीयुक्त पदार्थ नाश्त्यामध्ये सेवन करावेत.

सकाळच्या नाश्त्यानंतर दुपारी जेवण घ्यावे. तुम्ही दुपारचे जेवण १ ते ३ वाजेच्या दरम्यान घ्यावे. भाज्यांमध्ये जास्त तेल मसाले टाकू नका.

संध्याकाळी नाश्ता करणे देखील वजन कमी करण्यास उपयुक्त आहे. अशावेळी संध्याकाळचा नाश्ता म्हणून तुम्ही ग्रीन टी, भाजलेले हरभरे किंवा हलकी मसालेदार भेळ खाऊ शकता. हे हलके असतात आणि शरीरासाठीही फायदेशीर असतात. जे वजन कमी करण्यास मदत करू शकतात.

आहारतज्ञांच्या मते, रात्रीचे जेवण वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. दिवसभराच्या थकव्यासाठी आणि शांत झोपेसाठी रात्रीचे जेवण आवश्यक आहे. अशावेळी तुम्ही रात्री ब्रोकोली सूप, कॉर्न सूप किंवा सॅलडचे सेवन करू शकता. हा डिटॉक्स प्लान खूप खास आहे, याचे पालन केल्याने तुम्ही आठवड्यात थोडे वजन कमी करू शकता आणि चमकदार त्वचा देखील मिळवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com