Red Velvet Cake: 'व्हॅलेंटाइन डे' ला बनवा स्पेशल, जोडीदारासाठी घरीच ट्राय करा 'रेड वेलवेट केक'

व्हॅलेंटाइन डेला जोडीदाराला खास वाटण्यासाठी त्याच्यासाठी रेड वेलवेट केक बनवू शकता.
Red Velvet Cake
Red Velvet CakeDainik Gomantak

valentine day 2024 Red Velvet Cake recipe try home

प्रत्येक कपल्स वर्षभर फेब्रुवारी महिन्याची वाट पाहत असतात. कारण याच महिन्यात व्हॅलेंटाइन वीक सुरू येतो. या वीकची सुरूवात 7 फेब्रुवारी रोजी रोज डेने होते. यानंतर, 14 फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे पर्यंत दररोज काही खास दिवस साजरा केला जातो.

हा संपूर्ण वीक प्रेमाचा असतो. लोक त्यांच्या पार्टनरसोबत डिनर डेटवर जातात आणि त्यांचा दिवस खास बनवतात. असे बरेच लोक आहेत जे गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून दूर राहतात. अशावेळी ते घरीच डिनरचे प्लॅन करतात.

जर तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी घरी डिनर डेट प्लॅन करत असाल तर तुम्ही रेड वेलवेट केक बनवून सरप्राइज देऊ शकता. हा केक कसा बनवायचा जाणून घेऊया.

केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य

पीठ - दीड कप

दूध - 1 कप

कंडेंस्ड मिल्क - 3/4 कप

व्हिनेगर - दीड टेबलस्पून

रिफाइंड ऑइल - 1/4 कप

लिक्विड रेड फूड कलर - 2 टीस्पून

व्हॅनिला एसेन्स - दीड टीस्पून

साखर– 2 टेबलस्पून

बेकिंग सोडा - 1/2 टीस्पून

बेकिंग पावडर - 1 टीस्पून

कोल्ड हेवी क्रीम - आवश्यकतेनुसार

साखर पावडर - 1 टेबलस्पून

केक बनवण्याची पद्धत

रेड वेल्वेट केक बनवण्यासाठी सर्वात पहिले ओव्हन 175 डिग्री सेल्सियस वर गरम करा. यानंतर सर्वात पहिले एका मोठ्या भांड्यात कंडेन्स्ड मिल्क आणि रिफाइंड ऑइल, दूध घालून चांगले फेटून घ्या. यानंतर क्रीमी टेक्सचर मिळाल्यावर त्यात मैदा, बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स आणि बेकिंग सोडा घालून चांगले मिक्स करावे.

आता ते चांगले मिक्स करावे आणि हळूहळू त्यात दूध मिक्स करावे. लक्षात ठेवा की ते इतके फेटावे की त्यातील सर्व गुठळ्या निघून जातील. गुठळ्या राहिल्या तर केक नीट शिजत नाही. पीठ तयार झाल्यावर त्यात लाल रंगाचा फूड कलर घालून मिक्स करा. शेवटी त्यात थोडे व्हिनेगर घाला.

आता हार्ट शेपच्या साच्यात बटर लावून त्यात केकचे मिश्रण घालावे. या केकचे मिश्रण ओव्हनमध्ये 20 ते 25 मिनिटे बेक करावे. बेकिंग करताना, ते शिजले आहे की नाही हे मधेच एकदा तपासा. शिजल्यानंतर ते बाहेर काढून थंड करा.

आयसिंगसाठी बटर आणि क्रिम फेटून घ्या, नंतर आयसिंग शुगर आणि व्हॅनिला मिक्स करावे. आता या आयसिंगच्या मदतीने तुम्ही तुमच्या आवडीनुसार केक सजवू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com