Valentine's Day Home Decoration: घरीच व्हॅलेंटाईन डे साजरा करणार असाल तर अशी करा सुंदर सजावट

व्हॅलेंटाइन वीक सुरू झाला आहे. कपल्ससाठी हा वीक खुप खास असतो.
Valentine's Day Home Decoration
Valentine's Day Home DecorationDainik Gomantak
Published on
Updated on

valentine day 2024 beautiful home decoration ideas read full story

व्हॅलेंटाइन वीक सुरू झाला आहे. कपल्ससाठी हा वीक खुप खास असतो. प्रत्येक दिवस खास बनवण्यासाठी विविध प्लॅनिंग केले जातात. व्हॅलेंटाईन डे 14 फेब्रुवारीला साजरा केला जातो. तुमच्या जोडीदारासोबत खास पद्धतीने व्हॅलेंटाइन डे साजरा करण्यासाठी तुम्ही अनेक प्लॅनिंग करू शकता. या दिवशी कपल्स त्यांच्या जोडीदारांना घरी अनेक प्रकारे सरप्राइज देऊ शकतात. व्हॅलेंटाइन डेसाठी तुम्हाला तुमचे घर सजवायचे असेल तर तुम्ही काही खास सजावटीच्या पद्धतींचा वापर करू शकता.

लाल फुलांनी सजावट

व्हॅलेंटाईन डे स्पेशल करण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करतो. यासाठी तुम्हाला तुमचे घर रोमँटिक पद्धतीने सजवायचे असेल तर तुम्ही लाल फुलांचा वापर करू शकता. यासाठी तुम्ही लाल रंगामधील हार्ट शेपचे फुगे वापरू शकता. तुम्ही लाल फुलांनीही घर सजवू शकता. तुम्ही लाल रंगाच्या रिबनने भिंती सजवू शकता. तुम्ही बेडभोवती लाल फुगे लावू शकता आणि रूममध्ये लाइट्स देखील लावू शकता.

कँडल लाईट डिनरचा प्लॅन करू शकता
 
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी तुम्हाला तुमच्या पार्टनरला घरी सरप्राईज द्यायचे असेल तर तुम्ही कँडल लाईट डिनर प्लॅन करू शकता. यासाठी तुम्ही डिनर टेबलही सजवू शकता. मेणबत्त्या, फुले आणि चॉकलेट्सचा वापर करू शकता. मेणबत्त्या पेटवून तुम्ही डिनर टेबल फुलांनी सजवू शकता. तुम्ही हृदयाच्या आकाराचा केक देखील आणू शकता ज्यावर व्हॅलेंटाईन डे लिहिलेला असेल. ही सजावच तुमच्या गर्लफ्रेंडला नक्की आवडेल.

मेणबत्त्या

तुम्ही घराच्या गेटपासूनच सजावट करू शकता. ज्यामध्ये मेणबत्त्या किंवा रांगोळी काढून सजावच करू शकता. असे केल्याने तुमचा पार्टनर खूप आनंदी राहू शकतो आणि तुमचा व्हॅलेंटाइन डे खूप चांगला जाऊ शकतो.

लाइटिंग लावा

व्हॅलेंटाईन डेच्या खास प्रसंगी तुम्ही तुमच्या घराचा प्रत्येक कोपरा लाइटिंगने सजवू शकता.  घरात पडलेल्या रिकाम्या बाटल्या घेऊन त्यामध्ये लाइटिंग लावू शकता. त्यांचा प्रकाश पाहण्यासारखा आहे. जर तुमच्याकडे तेवढा प्रकाश नसेल, तर तुम्ही मेणबत्त्यांच्या मदतीने हे सर्व करू शकता. यामुळे घर आकर्षित दिसेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com