वैभव कवळेकर गोव्याचा हास्यसम्राट

'हास्यजत्रा' या स्पर्धेत वैभव कवळेकर याने प्रथम पुरस्कार पटकावला.
Vaibhav Kavalekar became the comedian of Goa
Vaibhav Kavalekar became the comedian of GoaDainik Gomantak
Published on
Updated on

दैनिक गोमन्तकच्या ‘यिन’ने (यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क) अलिकडेच “हास्यजत्रा’ ही स्पर्धा आयोजित केली होती. या हस्यजत्रेत अनेक विनोदवीरानी प्रेक्षकाना मनमुराद हसवले. या स्पर्धेत वैभव कवळेकर याने प्रथम पुरस्कार पटकावला व ‘हास्यजत्रे’चा तो सम्राट ठरला. हास्यवीराचे काम प्रेक्षकाना (Audience) हसवणे हे असले तरी त्याचे सादरीकरण ही गंभीर अशीच एक जबाबदारी असते. वैभवदेखील आपल्या ह्या जबाबदारीकडे गंभीरपणे पाहतो, हे त्याने दिलेल्या उत्तरातून जाणवत होते.

अशा तऱ्हेचे परफॉर्मन्स तुम्ही कधी पासून करता?

गेली 7 वर्षे ह्या क्षेत्रात आहे. अकरावीत असताना गोव्याचे (Goa) प्रसिद्ध हास्यकलाकार मनोहर भिंगी यांचं सादरीकरण मी एका कार्यक्रमात बघितलं, त्याचे विनोदाचे अचुक टायमिंग आणि एकंदरीत सादरीकरण पाहून प्रेरणा मिळाली. मी पण हे करु ‌शकतो असं मला वाटलं आणि तिथुनच माझा प्रवास सुरू झाला.

तुम्हाला कोणाचे मार्गदर्शन लाभते. ?

विनोदी सादरीकरण करायला टायमिंग (Timing) महत्वाचं आहे. ते माझ्याकडे होतं. पण सादरीकरणात नेमकं कन्टेंट (Content) काय हे माहित नव्हतं. त्यासाठी मला प्रा. दिलीप धारगळकर यांचं मार्गदर्शन लाभलं. शिवाय डाॅ राजय पवार, दिलीप बोरकर, कृ. म. सुखटणकर या लेखकाच्या पुस्तकांचं वाचन करून मला समजलं, विनोद आपल्या चाकोरीबध्द आयुष्यातच लपलेला असतो.

Vaibhav Kavalekar became the comedian of Goa
प्रियोळ येथील ‘मिस्टिक वुड्स’ बनले पर्यटकांचे आकर्षण

तयारी कशी करतात?

मी कोंकणी भाषेतून सादरीकरण करतो. सादरीकरण करण्याआधी, सादरीकरण कोणत्या ठिकाणी आहे हे बघतो व त्यानुसार विनोद ठरवतो. थोडसं स्क्रिप्टींगपण (Script) करतो आणि त्यानंतर सादरीकरण करतो.

आतापर्यंत केलेले महत्त्वाचे परफॉर्मन्स कुठले?

* प्रुडंण्ट मिडिया आयोजित ‘प्रुडंण्ट काॅमेडी स्टार’ ह्या स्पर्धेचा मी उपविजेता आहे, लायन्स क्लब मडगांव (Lions Club Margao) आयोजित ‘हास्यसम्राट’ ह्या स्पर्धेत मला तृतीय पारितोषिक लाभले आहे. त्याशिवाय आंतर महाविद्यालयीन आणि इतर कार्यक्रमात मी सादरीकरण केले आहे.

सध्या काय करता ?

मी कोंकणी विषयांत एम. ए केलेलं आहे आणि सध्या कला अकादमीच्या ‘गोवा काॅलेज अॉफ थिएटर आर्ट’ मध्ये (Goa Collage Of Theater Art) नाट्यशास्त्राचे शिक्षण घेत आहे.

आज स्टॅन्डअप कॉमेडीयनवर वेगवेगळ्या कारणासाठी बंदी येते आहे, त्यांचे सादरीकरण रद्द होत आहे त्यावर तुमचे मत काय?

आज स्टॅन्डअप कॉमेडीयनवर (Standup Comedian) बंदी येते त्याला वेगवेगळी कारणं आहेत. लोकं हसतात म्हणुन काॅमेडी (Comedy) करणाऱ्याने अतिशयोक्ती करू नये. ज्या गोष्टीवरुन वाद निर्माण होऊ शकतो अश्या गोष्टी टाळाव्या. वादग्रस्त वक्तव्ये करू नयेत. नैतिकता न सांभाळल्याने व वादग्रस्त सादरीकरणामुळे शो रद्द होतात. जर हे क्षेत्र विकसित व्हायला हवं तर ह्या सगळ्या गोष्टींची खबरदारी घेणे आवश्यक आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com