Tips For Soft Feet: तुम्हालाही पाय मऊ ठेवायचे असतील तर 'या' गोष्टींचा करा वापर

Soft Feet Care tips: प्रत्येक ऋतुत चेहऱ्यासोबतच पायांचेही सौंदर्याच्या काळजी घेणे गरजेचे असते. यासाठी पुढील गोष्टीं लक्षात ठेवल्या पाहिजे.
Tips For Soft Feet
Tips For Soft FeetDainik Gomantak
Published on
Updated on

use these things for keep soft feet home remedies

चेहरा आणि हातांसोबतच पायांच्या सौंदर्याचीही काळजी घेणे गरजेचे असते. पायांचे सौंदर्य टिकवण्यासाठी आपण पार्लरमध्ये जाऊन पेडीक्योर करून घेतो किंवा बाजारात उपलब्ध असलेली उत्पादने वापरतो.

ही उत्पादने महाग असतात. तसेच यामध्ये केमिकल खुप असतात. तुम्ही घरगुती पदार्थांनी पायांची काळजी घेऊ शकता.

  • पाय मऊ दिसण्यासाठी काय करावे

तुमचे पाय सुंदर आणि मऊ ठेवण्यासाठी दररोज तुमचे पाय चांगले धुवावे. याशिवाय, झोपण्यापूर्वी तुमचे पाय स्वच्छ पाण्याने धुवावे. यानंतर पायांवर क्रीम लावा आणि काही वेळ मसाज करावी. सुंदर आणि मऊ पायांसाठी, आंघोळीनंतर मॉइश्चरायझर वापरावे. असे केल्याने तुमचे पाय सुंदर तर होतीलच, पण पायाची त्वचाही मऊ होईल.

तुमच्या पायांना मसाज करण्यासाठी तुम्ही खोबरेल तेल, कोरफड जेल किंवा पेट्रोलियम जेली वापरू शकता. यासोबतच पायाला मसाज करण्यासाठीही तुपाचा वापर देखील करू शकता.

  • पायांवर स्क्रब कसे करावे

तुमचे पाय सुंदर आणि मऊ दिसण्यासाठी तुम्ही घरगुती स्क्रब तयार करू शकता. घरगुती स्क्रबमुळे तुमच्या पायाची डेड स्किन निघून जाईल आणि तुमच्या पायाची त्वचा खूप मऊ होईल. तुम्ही तांदळाचे पीठ किंवा रव्यामध्ये दुध किंवा दही टाकून पायांना स्क्रब करू शकता. पायांना स्किरब केल्यानंतर तेल लावावे.

  • या गोष्टींचीही घ्या काळजी

टॅनिंगमुळे पायांची त्वचा काळी पडते. ही समस्या दूर करण्यासाठी बाहेर जाताना पायात मोजे घालावे. पायात सॉक्स घातल्याने टॅनिंगची समस्या कमी करता येते, तर पायांची त्वचाही निरोगी राहते.

आठवड्यातून एकदा पायांना स्क्रब करावे. असे केल्याने पाय चमकदार तर होतीलच पण पायाची त्वचाही मऊ देखील राहिल. स्क्रब केल्यानंतर पायांची त्वचा कोरडी होऊ नये म्हणून मॉइश्चरायझर वापरावे.

रात्री झोपण्यापूर्वी पायांना मसाज करावी. असे केल्याने पायातील घाण दूर राहते. तसेच रक्ताभसरण देखील योग्य होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com