Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी वापरा स्वयंपाकघरातील 'हे' पदार्थ

आजकाल बदलती जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, जंक फूडचे सेवन यामुळे अनेकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो.
Weight Loss
Weight LossDainik Gomantak

वजन वाढवणे जितके सोपे आहे तितकेच कठीण आहे वजन कमी करणे. वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायामासह आपल्या आहाराकडेही नीट लक्ष देणे खूप गरजेचे असते. स्वयंपाकघरातील काही पदार्थांचा मदतीने तुम्ही वजन कमी करू शकता.

आजकाल बदलती जीवनशैली आणि खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी, जंक फूडचे (junk food) सेवन यामुळे अनेकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो. पण लठ्ठपणामुळे तुम्ही अनेक धोकादायक आजारांना बळी पडू शकता. अशा परिस्थितीत वाढत्या वजनावर वेळीच नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

वाढलेले वजन कमी करण्यासाठी लोक डाएटिंग, व्यायाम करतात. पण आपल्या स्वयंपाकघरात असलेल्या काही पदार्थांमुळेही वजन नियंत्रित करता येते, हे तुम्हाला माहिती आहे का ? त्याबद्दल जाणून घेऊया.

1) मधाचे सेवन करा-

मध हा प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात असतोच. त्याचे सेवन करून तुम्ही वजन कमी करू शकता. यासाठी कोमट पाण्यात मध मिसळून ते पाणी रोज रिकाम्या पोटी प्यावे. हे चरबी कमी करण्यास उपयुक्त आहे.

2) हळद ठरते फायदेशीर-

हळदीमध्ये औषधी गुणधर्म आढळतात. ती अनेक रोगांपासून संरक्षण करण्यासाठी उपयुक्त आहे. हळदीच्या नियमित सेवनाने तुम्ही लठ्ठपणाही कमी करू शकता. वजन कमी करण्यासाठी पाण्यात हळद घालून ते उकळून घ्यावे, आणि नंतर ते पाणी प्यावे.

Weight Loss
Green Tea: ग्रीन टीच्या अतिसेवनामुळे फायदा नाही, फक्त नुकसानच

3) दालचिनीचा करा वापर-

दालचिनी ही अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांनी समृद्ध आहे. त्याच्या वापरामुळे मेटाबॉलिज्म वाढते, ज्यामुळे वजन वेगाने कमी होण्यास मदत होते. शरीरातील चरबी कमी करण्यासाठी तुम्ही दररोज कोमट पाण्यासोबत दालचिनीचे सेवन करू शकता.

4) लिंबू ठरते प्रभावी-

लिंबूमध्ये व्हिटॅमिन-सी आणि फायबर पुरेशा प्रमाणात आढळते. त्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. वजन कमी करण्यासाठी तुम्ही लिंबाचा आहारात समावेश करू शकता.

Weight Loss
Health Tips: पुरेशी झोप ठेवते शारीरिक आणि मानसिक आजारांना दूर

5) जिऱ्याचे सेवन करा-

जिरे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. भाजी फोडणील घालताना अनेक जण त्यात जिरं घालतात. वजन कमी करण्यासाठी देखील जिरं उपयुक्त ठरतं. त्यासाठी रात्रभर पाण्यात जिरं भिजवून सकाळी उठल्यावर ते पाणी प्यावं.

6) मेथी दाणे-

मेथीचे दाणे किंवा बियांमध्ये फायबर असते आणि कॅलरीज खूप कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी ते उपयुक्त ठरते. याच्या सेवनाने पचनाच्या समस्यांवरही मात करता येते.

(आयुर्वेदिक चिकित्सा ही व्यक्तिपरत्वे होणारी असते. वरील माहितीमधील औषधे तज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखालीच घ्यावीत)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com