केस गळण्याबरोबरच (Hair loss) केसांना फाटे फुटण्याच्या (Split Ends) समस्येमुळे अनेक मुली त्रस्त असतात. याचे कारण म्हणजे केसांची आयोग्य (hair health) काळजी आणि हीटिंग टूल्स वापरणे. केसांचे आरोग्य चांगले न ठेवल्यास केस पातळ, निर्जीव होऊन केसांचे आरोग्य खराब होते. अनेक मुली प्रत्येक महिन्यात केसांचे फाटे (Split Ends) कमी करण्यासाठी केस (hair cut) कापतात. परंतु या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही घरगुती हेयर मास्क नक्की वापरू शकता. यामुळे तुम्हाला दर महिन्याला केस कापण्याची गरज पडणार नाही. हे मास्क तुम्ही रात्रभर केसांमध्ये ठेवू शकता. चला तर मग जाणून घेऊया या मास्कचे फायदे आणि वापर.
* साहित्य
* कडीपत्ता - 12 ते 15
* रातणजोत पावडर - 1 चमचा
* आवळा पावडर - 1 चमचा
* नारळ तेल - 3 चमचे
* लोखंडी कढई
* टीप- आपल्या केसांच्या लांबीनुसार घटक वाढवू किंवा कमी करू शकता.
* पद्धत
* हेयर मास्क तयार करण्यासाठी सर्वात प्रथम सर्व साहित्य कढईमध्ये मिक्स करावे.
* रात्रभर झाकून ठेवावे.
* दुसऱ्या दिवशी सकाळी मिश्रण चाळणीतुन गळून घ्यावे आणि तेल वेगळे करा.
* या तेलाल थोडे गरम करून घ्यावे.
* केसांना लावण्यासाठी तयार आहे हेयर मास्क
* कसे वापरावे
* झोपण्यापूर्वी हे मास्क केसांच्या मुळात चांगले लावावे. थोडा वेळ केसांमध्ये मसाज करावी.
* दुसऱ्या दिवशी केस सौम्य शॅम्पूने धुवावे.
* असे आठवड्यातून दोन वेळा कारावे.
* हेयर मास्क लावण्याचे फायदे
* या हेयर मास्कमधील सर्व घटक नैसर्गिक असल्याने केसांना कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही.
* हे मास्क लवळल्याने केसांच्या मुळा मजबूत होण्यास मदत मिळते.
तसेच केसांना फाटे फुटणे कमी होते.
* कडीपत्त्याच्या हेयर मास्क नियमित लावल्याने केस घनदाट होतात आणि पांढऱ्या केसांपासून सुटका मिळते.
* या हेयर मास्कचा वापर केल्याने केसांचे आरोग्य चांगले राहून केस लांब आणि मजबूत होतात.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.